‘सुकेश चंद्रशेखर म्हणाला होता, CM जयललिता…’, Jacqueline Fernandez चा मोठा खुलासा


Money Laundering Case : 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) सध्या दिल्लीच्या (Dehli) मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेशसोबतच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering) चौकशीच्या फेऱ्यात आहे. जॅकलीनच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. यावेळी सुकेशनं तिच्या भावनांशी खेळून तिचे आयुष्य नरकापेक्षा कमी केलेले नाही, असे जॅकलीन बुधवारी दिल्ली न्यायालयात म्हणाली आहे. 

जॅकलिननं दिलेल्या माहितीनुसार, सुकेशनं तो सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगत ओळख करून दिली होती. इतकंच काय तर त्यानं असा दावा केला की तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्याची मावशी होती. याविषयी सांगत जॅकलीन म्हणाली, ‘सुकेश म्हणाला की तो माझा खूप मोठा चाहता आहे आणि मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करायला हवे. तो सन टीव्हीचा मालक असून तो मला अनेक प्रोजेक्ट्स देईल असे त्यानं सांगितले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपण एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’

जॅकलिन म्हणाली, ‘सुकेशने माझी फसवणूक केली, ‘माझे करिअर उद्ध्वस्त केले. मला खूप उशिरा याची माहिती मिळाली की त्याला गृह आणि कायदा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अटक केले. त्यानंतर मला त्याचं खरं नाव कळलं. तर पिंकी इराणीनं याविषयी कधीही कोणता खुलासा केला नाही तिनं देखील माझा विश्वासघात केला.’

हेही वाचा : Rakhi Sawant Viral Video : आदिलसोबत विवाहानंतर राखीनं परिधान केला बुरखा…तशीच आली आईच्या भेटीला

सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या मौल्यवान भेटवस्तू दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबाला दिलेल्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. आता खुद्द सुकेशनेही याबाबत कबुली दिली आहे. (Sukesh Gave 10 crore Gifts to Jacqueline Fernandez)

त्याचवेळी जॅकलीन आणि सुकेश यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकमेकांसोबत प्रेमसंबंधात होते. काही काळापूर्वी जॅकलिन आणि सुकेशचे काही इंटिमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यानंतर लोकांनी त्यांना खूप ट्रोल केले होतेSource link

Leave a Reply