Headlines

आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प – दीपक केसरकर

[ad_1]

पणजी, गोवा : CM Eknath Shinde News : महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केला आहेत. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे कृषी दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा संकल्प केलाय आहे, अशी माहिती शिंदे समर्थक गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिली आहे.

आज गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेण्यासाठी मुंबईला जाणार आहेत, असे केसरकर म्हणाले. मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूरस्थिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आमच्यासोबत थांबलेले नाही. अन्यथा, आमचे विरोधक म्हणतील की ते गोव्यात पर्यटक म्हणून गेले आहेत का?, असे सांगत आपत्तीग्रस्तांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री मुंबईला जात आहेत, असे दीपक केसरकर म्हणाले.

एक मुख्यमंत्री आहे जो प्रत्यक्षात काम करतो आणि राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊ शकतो. असे एक उपमुख्यमंत्री आहेत ज्यांना आपण माजी मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री कसे होणार याची कल्पनाच नव्हती. मात्र, दोघांमध्येही एवढी जाण आणि जिद्द आहे की, एकत्र आल्यास महाराष्ट्र बदलू शकतो, असे दीपक केसरकर म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हॉटेल ताजमधील आमदार डान्स संदर्भात टीका होऊ लागली. याबाबत केसरकर म्हणाले, आनंदाच्या भरात काही चुका झाल्या. आमच्या आमदारांकडून असे प्रकार घडणार नाही. थोडासा तोल गेला, पण यापुढे घडणार नाही. मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात हे अस घडू नये असं सांगितले आहे. तुमचा तोल सुटता कामा नये, असे मुख्यमंत्री यांनी आमदारांना स्पष्ट सांगितले, अशी माहिती केसरकर यांनी दिली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *