Headlines

असे क्रिकेटर्स ज्यांनी बहिणीशी बांधली लग्नगाठ, यादीतील नावं धक्कादायक

[ad_1]

मुंबई : रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या आणि बहिणींच्या प्रेमाबद्दल आणि नात्याबद्दल बरंच काही बोलले जाते. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही क्रिकेटर्सबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी चक्कं त्यांच्या बहिणीशीच लग्न केलं आहे. होय हे खरं आहे… फक्त या खेळाडूंनी त्यांच्या चुलत बहिणींशी लग्न केलं ज्यामुळे ते सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे. 

या यादीत एक-दोन नाही तर चक्कं चार क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी प्रेमापुढे कुठलंही नातं पाहिलं नाही आणि आपल्याच चुलत बहिणीशीच लग्न केलं आहे.

चला ते क्रिकेटर्स कोण आहेत, जाणून घेऊ या.

शाहिद आफ्रिदी आणि नादिया

या यादीत पहिल्या स्थानावर आहे, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी. याने वयाच्या 20 व्या वर्षी आपल्या मामाची मुलगी नादियाशी लग्न केले. तेव्हापासून ते जवळपास 19 वर्षे एकत्र आहेत. परंतु नादिया कधीही शाहिदसोबत सामन्यादरम्यान एकत्र दिसली नाही. शाहिद आफ्रिदीने 22 ऑक्टोबर 2000 रोजी नादियाशी लग्न केलं. नात्याने नादिया शाहिदची बहिण आहे. परंतु मामाची मुलगी असल्याने त्याने तिच्याशी लग्न केलं. शाहिद आणि नादिया यांना अक्सा, अंशा, अजवा, अस्मारा आणि अर्वा असे 5 मुलं आहेत.

2. मुस्तफिजुर रहमान आणि सामिया परवीन

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानने मधल्या काळात खूप प्रसिद्धी मिळवली. आयपीएलने त्याला वेगळीच ओळख दिली. या खेळाडूने आपल्या चुलत बहीणीशी लग्न केलं. सामिया परवीन शिमू ही मानसशास्त्राचा अभ्यात करते. मार्च 2019 मध्ये त्यांचे लग्न झालं आहे.

3. मोसद्देक हुसैन और शर्मीन समीरा

बांगलादेश क्रिकेट संघाचा युवा क्रिकेटर मोसाद्देक हुसेनने 2012 मध्ये त्याची चुलत बहीण शर्मीन समीरासोबत लग्न केलं. मोसाद्देक हुसैन हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणामुळे मोसाद्देकलाही संघातून आपले स्थान गमवावे लागले.

4. सईद अन्वर आणि लुबना

1996 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर सईद अन्वरने त्याची चुलत बहिण लुबनाशी लग्न केले. लुबना ही व्यवसायाने डॉक्टर आहे. योगायोगाने हेच वर्ष होते जेव्हा सईद कसोटी क्रिकेटच्या मैदानात आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत होता. अन्वर त्याच्या आयुष्यातील आनंदी क्षणांचा आनंद घेत होता की 2001 मध्ये अचानक त्याच्या मुलीचा अकाली मृत्यू झाला आणि त्यानंतर तो खूपच तुटला. हा खेळाडू आपला खेळ पुढे सुरू ठेवू शकला नाही आणि 2003 च्या विश्वचषकानंतर तो निवृत्त झाला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *