“ऑपरेशन परीवर्ततन” ची यशस्वी वाटचाल , मुळेगाव तांडा येथील हातभट्टी दारू बंद करण्यासाठी सरसावली ” नारी शक्ती”

सोलापूर – श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर जिल्हयामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी “ऑपरेशन परीवर्तन” हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत असा व्यवसाय करणारे लोकांवर केसेस करणे, समुपदेशन करणे, पुनर्वसन करणे व जनजागृती करणे असा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये मौजे मुळेगाव तांडा, ता. द. सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची निर्मीती होत असल्याने सदरचा तांडा हे मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दत्तक गाव म्हणून घेतले आहे.

“ऑपरेशन परीवर्ततन” अंतर्गत मौजे मुळेगाव तांडा येथे पोलीस अधीक्षक व त्यांच्या पथकाने वेळोवेळी छापा घालून हातभट्टी दारू, रसायन व भट्टी साहीत्य मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक यांनी मुळेगाव तांडा येथील युवक वर्ग व महिलांच्या बैठका घेवून कायदेशीर व्यवसाय सुरू करण्याबाबत समुपदेशन केले होते. त्यामध्ये महिलांनी फॅशन डिझायनींग व शिलाई मशिन ऑपरेटर ही कामे करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती.

त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समन्वयातून जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर व MITCON यांच्या संयुक्त विद्यमाने तेथील महिलांना फॅशन डिझायनींग व शिलाई मशिन ऑपरेटरचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली होती. त्यावरून आज दिनांक २६/११/२०२१ रोजी मुळेगाव तांडा येथील एकूण ३० महिला सदर प्रशिक्षण घेण्यासाठी हजर राहील्या असून या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रम हा अॅपेक्स गारमेंट, होटगी येथे आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी अॅपक्स ग्रारमेंटचे श्री. यासीफ यत्नाळ यांनी मुळेगाव तांडा येथील महिलांना मोफत प्रशिक्षण देणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्काळ त्यांचे कंपनीमध्ये प्लेसमेंट देणार असल्याचे सांगितले. मा. पोलीस अधीक्षक यांनी ‘कोणताही बदल घडवून आणण्यासाठी नारीशक्तीचा सहभाग व पाठींबा असणे अत्यंत आवश्यक असते. मुळेगाव तांडा येथील दारू बंद करण्यासाठी तांड्यातील महिला या पुढे येवून सदर कायदेशीर व्यवसाय सुरू करण्याचे सिमोल्लंघन केले आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुळेगाव तांडा येथील महिलांनी देखील त्यांचे बी.एससी, बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाले असून त्यांना दारूबंदीचा व्यवसाय सोडून कायदेशीर व्यवसाय करावयाचा असून मुळेगाव तांडा या गावावर लावण्यात आलेला हातभट्ट दारूचा ठपका पुसून टाकण्याचा मानस व्यक्त केला.

सदर प्रसंगी मा. श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर गामीण, श्री. संतोष कोलते, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर, श्री. यासीन यत्नाळ, सी.ई.ओ. अॅपेक्स गारमेंट, श्री. लोंढे, मिटकॉन सोलापूर, श्री. अभय दिवाणजी, सहयोगी संपादक, सकाळ, श्री. निचळ, विमानतळ प्राधीकरण, सोलापूर, श्री. सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. सोलापूर ग्रामीण, श्री अरुण फुगे, पो.नि. सोलापूर ता.पो.स्टे. श्री. अतुल भोसले, सहा.पो. निरीक्षक, वळसंग पो.स्टे. श्री. निलकंठ जाधवर, सहा. पो. फौजदार, स्था. गु. शा. सोलापूर हे उपस्थीत होते.

Leave a Reply