Headlines

Success Story: पहिली कमाई 200 रूपयांची, आता 200 crore चित्रपट, निर्मातीचा संघर्षमय प्रवास

[ad_1]

Success Story: बॉलीवूडमध्ये अनेक होतकरू कलाकार येतात आणि आपलं वेगळं असं स्थान निर्माण करतात परंतु त्यांचा संघर्ष मात्र सोप्पा नसतो. अशाच एका निर्मातीचा प्रवासहही फार खडतर राहिला होता ज्यावर मात करत आज तिने 200 कोटी रूपयांचा सिनेमा तयार केला आहे. 

ही मुलगी आहे निर्माती चार्मी कौर. अभिषेक बच्चन याचा डेब्यू सिनेमा ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ मध्ये चार्मी कोरने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चार्मीने सांगितले की मी चित्रपटांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान मला माझ्या कामाबद्दल दोनशे रुपये मिळाले होते. माझ्या आयुष्यात एक असा टप्पा आला जेव्हा माझ्या घरातील सदस्यांकडे माझ्या शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते.

चार्मीच्या घरातील सदस्य तिच्या अभिनयाच्या विरोधात होते. तिला हृतिक रोशन आणि करीना कपूरच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, त्यांनी ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली. पण ते तिच्या या कामाबद्दल नाराज होते. आपले आईवडिल नकार देतायत या विचाराने ती खुपच दुःखी झाली होती. पण खूप विनवणी केल्यानंतर तिचे आईवडीलांनी तिला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली. 

चार्मीने साऊथ इंडियन फ्लिम्समध्येही काम केलं आहे पण त्यातील पाच-सहा चित्रपट फ्लॉप ठरले. 

चार्मीने पंधरा वर्ष अभिनय केला आणि आता ती निर्माती झाली आहे. तिने तिच्या सहकार्यांसह 2015 मध्ये ‘पुरी कनेक्ट्स’ नावाने एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले. 

शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. – चार्मी कौरचा जन्म 17 मे 1987 रोजी मुंबईला लागून असलेल्या वसई येथे झाला. वडील दीपसिंग भूपत यांचा गोरेगाव पूर्व येथे नट बोल्टचा कारखाना होता. अचानक त्यांना अर्धांगवायू झाला आणि कारखाना बंद करावा लागला. चार्मी कौर म्हणते, ‘वडिलांच्या आजारपणामुळे कारखाना बंद झाल्याने आम्ही खूप अडचणीत आलो. शाळेत फी भरायला पैसे नव्हते. कधी कधी माझे शेजारी शेट्टी काका माझ्या शाळेची फी भरायचे. वडील वास्तुशास्त्राचे जाणकार होते, त्यामुळे घरचा खर्च कसातरी भागत होता. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो आणि मला वाटू लागले की मीही काही काम करावे.’



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *