स्टंटच्या नादात तरुणाकडून घडली एक चूक, डोंगरावरुन उडी मारली पण… पाहा व्हिडीओ


मुंबई : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्या नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. येथे आपल्याला कॉमेडी, इंफोर्मेटीव्ह आणि बरेच क्राफ्ट व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. तसेच असे अनेक स्टंटचे देखील व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असं देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका एडवेंचर अॅक्टिव्हिटीचा आहे. ज्यामध्ये हा तरुण करायला जातो एक आणि त्याच्यासोबत घडतं भलतंच.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण डोंगराच्या कड्यावर उभा आहे आणि त्याला एक दोरी बांधली आहे. ज्याच्या सहाय्याने हा तरुण एडव्हेंचर करणार असतो, परंतु त्याच्यासोबत काही भलतंच घडतं.

हा तरुण जेव्हा डोंगराच्या कड्यावरुन उडी घेतो तेव्हा त्याला वाटतं की, तो त्या दोरीच्या सहाय्याने हवेत वर उडेल, परंतु तसे होत नाही. उलट त्याचा तोल जातो आणि तो खाली दगडावर जोरात आदळतो.

हा व्हिडीओ पाहून तुम्ही अंदाजा लावू शकता की, या तरुणाला किती दुखापत झालेली असावी. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओला climb_worlld नावाच्या सोशल मीडीया अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडाओला 1.5 लाखापेक्षाही जास्त लाईक्स आणि व्ह्यूव्स मिळाले आहेत. नेटकरी या व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत.Source link

Leave a Reply