Headlines

कोरोना नियमांचे कडक पालन करून शाळा सुरू कराव्यात – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे – महासंवाद


बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :जिल्ह्यातील 1 ते 12 पर्यंतच्या सर्वच शाळा कोरोना नियम, शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात. शाळांमध्ये सॅनीटायझेशन, सोशल डिस्टसिंग व हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेण्यात यावी, अशा सूचना आज पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या.

शाळा सुरू करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री परिस्थितीचा आढावा घेत बोलत होते. याप्रसंगी जि.प अध्यक्ष मनीषाताई पवार, आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, श्री. मुकूंद आदी उपस्थित होते.

कोरोनाचे सर्व नियम शळांना पाळण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, 28 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. शाळेत सर्वांना मास्क वापण्याची सक्ती करावी. याबाबत शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सुचना निर्गमीत कराव्यात, असे आदेशही पालकमंत्री यांनी दिले.

शाळा सुरू करणेबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याबाबत मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 27 जानेवारी 2022 पर्यंत आरटी पीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. शाळा दररोज किमान 3 ते कमाल 4 तास कालावधीसाठी घेण्यात यावी. इयत्ता 9 वी ते 12 वीच्या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात यावी. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये सकाळ / दुपार अशा दोन पाळी वर्ग भरविण्यात यावे. मैदानावरील खेळ, स्नेह संमेलन, दैनिक परिपाठ आदी गर्दीच्या कार्यक्रम आयोजनावर बंदी राहील. विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला असल्यास शाळेत येण्याबाबतची सक्ती करण्यात येवू नये. विद्यार्थ्यांच्या पालकांचे 100 टक्के लसीकरण करण्याच्या दृष्टीने पालकांना प्रोत्साहन देवून जनजागृती करावी. लसीकरण न झालेल्या शिक्षकांना शाळेत प्रवेश देवू नये. शाळेत उपस्थित राहण्याकरीता पालकांची लेखी संमती आवश्यक राहणार आहे. एका बाकावर शक्यतो एकच विद्यार्थी बसेल याची खबरदारी घ्यावी. तसेच दोन बाकांमध्ये सुरक्षीत अंतर राखण्यात यावे. विद्यार्थ्यांना शाळेत हात धुण्याची व्यवस्था करावी. शालेय परीसराची नियमित स्वच्छता राखावी, असे शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक आदेशात नमूद आहे.

घानमोड, मानमोड व पांढरदेव येथील भुखंड वाटप तातडीने करावे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
  • तेल्हारा गावातील नागरी सुविधांची कामे पूर्ण करावी

बुलडाणा, (जिमाका) दि. 24 :पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या घानमोड, मानमोड व पांढरदेव गावांचे पुनर्वसन करावयाचे आहे. याबाबत संबंधित यंत्रणांनी कालबद्ध कार्यवाही करावी. घानमोड व मानमोड येथील पुर्नवसित गावाच्या जागेवरील भूखंडाचे तातडीने वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.

घानमोड, मानमोड व पांढरदेव येथील पुनर्वसन आणि तेल्हारा येथील नागरी सुविधांबाबत आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री डॉ. शिंगणे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे आदी उपस्थित होते. तसेच सभागृहात जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. माचेवाड, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता सुनील चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. शिंगणे पुढे म्हणाले, घानमोड व मानमोड येथील भूखंडावर अतिक्रमण असल्यास आहे, त्याच स्थितीत त्याच जागेवर भुखंड देवून पुनर्वसन करण्यात यावे. याबाबत निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा. त्याचप्रमाणे पांढरदेव येथील भूखंडांचे सीमांकन करून घ्यावे. सीमांकन झाल्यानंतर विनाविलंब भुखंडाचे वाटप करावे. यामध्ये दिरंगाई करू नये. निधी, भूखंड वाटप व नागरी सुविधांच्या कामांचा कालबद्ध कार्यक्रम आखावा. या कार्यक्रमाचे वेळापत्रकच उपोषणकर्त्यांना देवून उपोषण कर्त्यांचे समाधान करावे. तसेच काही भूखंडावर घरे असल्यास व ती पडलेली असल्यास त्या घरांचे जुन्याच मुल्यांकनानुसार मुल्यांकन करावे.

ते पुढे म्हणाले, भूसंपादन प्रकरणे निधीअभावी व्यपगत झाली आहेत. या प्रकरणांमध्ये तातडीने निधी मागणी प्रस्ताव संबंधित यंत्रणेने वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून निधी उपलब्ध करून घ्यावा. तसेच पारंपारिक पद्धतीने भुसंपादन केल्यापेक्षा सरळ खरेदी पद्धत अवंलबवावी. यामुळे गतीने भुसंपादन होवून मोबदलाही तातडीने देणे शक्य होईल. तेल्हारा या गावाने स्वेच्छा पुनर्वसन केले आहे. ही अभिनंदनीय बाब आहे, या गावाने शासनाचा मोठा निधी वाचविला आहे. त्यामुळे तेल्हारा येथील भूखंड मालकांची नावे नमुना 8 वर चढवावी. त्यासाठी लाभार्थीनुसार भुखंड वाटप करून हा प्रश्न सोडवावा. तसेच गावातील नागरी सुविधांची कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. याबाबत स्वतंत्र बैठकही घेण्यात येईल. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या मासरूळ व अमडापूर गटातील प्रलंबित, नवीन प्रस्तावित कामे पुर्ण करावी. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, जनसुविधा अंतर्गत निधीची तरतूद करावी. पांदण रस्ते, जामठी येथील शाळा खोल्यांचे बांधकाम तातडीने पुर्ण करावे. अमडापूर गटातील स्मशान भूमी सौंदर्यीकरण, पाझर तलाव दुरूस्ती करावी.

यावेळी आमदार श्वेताताई महाले यांनीसुद्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडण्यासाठी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेताताई महाले यांनीसुद्धा यापूर्वी उपोषणकर्त्यांच्या मंडपाला भेद देवून विनंती केली आहे. तसेच जलसंपदा विभागाच्यावतीनेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

************

Source link

Leave a Reply