सई ताम्हणकरने सांगितला मराठीसृष्टीत पहिल्यांदा बिकिनी घातल्यानंतरचा ‘तो’ किस्सा


मुंबई : अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच सईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने बिकिनी परिधान केल्यामुळे तिला मराठी चित्रपटसृष्टीने कशी वागणूक दिली आणि त्यानंतर तिला कसे चित्रपट मिळू लागले यावर वक्तव्य केलं आहे.

सनई चौघडे सिनेमामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणारी सई ताम्हणकर, कधी एक सुपरस्टार बनली हे समजलंच नाही. आज केवळ मराठी सिनेसृष्टीच नाही तर, बॉलीवूडमधेही सईने आपल्या कामाचा डंका वाजवला आहे. 

दुनियादारी सिनेमानंतर तिच्या करिअरला कलाटणी मिळाली, आणि सई ताम्हणकर हे नाव पुन्हा चर्चेत आलं. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट मराठी सिनेमांमध्ये काम केलं. मराठी चित्रपट ‘नो-एंट्री पुढे धोका आहे’ या सिनेमात सईने बिकिनी घालून धुमाकूळ घातला. मराठी सिनेसृष्टीमधे पहिली बिकिनी घालणारी अभिनेत्री ही सईच होती

तिच्या बोल्ड अंदाजामुळं तिला हंटर या बॉलीवूडच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. आणि या संधीचा तिने पूर्ण उपयोग केला. या सिनेमात तिच्या बोल्डनेसने चांगल्याच चर्चा रंगल्या. तिच्या या बोल्डनेस बद्दल आणि पहिल्यांदा ऑन-स्क्रीन बिकिनी घातली त्याबद्दल तिला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलं होतं.

यावर उत्तर देत सई म्हणाली, ”जेव्हा मी बिकिनी परिधान केली, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीने मोकळ्या मनाने माझं स्वागत केलं. पण असं जरी असलं तरी थोड्याप्रमाणात माझ्यावर टीकाही झाली.

आश्चर्याची बाब म्ब म्हणजे सर्वानी अगदी मोकळ्या मनानं माझं कौतुक केलं. काहींनी ट्रोल केलं, मात्र माझ्या चाहत्यांना माझा बोल्डलूक खूप आवडला आणि मला वाटतं पडद्यावर आपल्या प्रेक्षकांना जे हवं असतं तेच आपण करतो. म्हणूनच त्यानंतर हंटर सारख्या सिनेमात देखील मी अगदी बिनधास्तपणे काम केलं.’  .Source link

Leave a Reply