Headlines

किस्सा | लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना पोटाला पिस्तुल लावून धमकावलं, कारण

[ad_1]

मुंबई : प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी झी मराठीच्या कार्यक्रमात एक भन्नाट किस्सा सांगितला, हा किस्सा तुम्हाला शेवटपर्यंत वाचल्याशिवाय समजणार नाही, किंवा अर्ध्यात वाचून समजणारा हा किस्सा नाही.

सुरेखा पुणेकर यांच्या लावणीचा कार्यक्रम होता, त्यांचे सर्व महिला सहकारी मेकअप करण्यात गुंतले होते, सुरेखा पुणेकर म्हणतात, माझा मेकअप अर्ध्यात आला होता, तितक्यात एकजण अचानक मध्ये आला. तो गुंड होता, पण पाहिल्यावर तो गुंड वाटत नव्हता असा तो गुंड होता.

सुरेखा पुणेकर म्हणतात, “तो गुंड माझ्या मेकअप रुमच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, अय कलाकारांनो सुरेखा पुणेकर कुठांय?”

सुरेखा पुणेकर यांनी स्वत:च्या कमरेवर दोन्ही हात ठेवले आणि ठासून विचारलं, “काय हो काय पाहिजे तुम्हाला. तेव्हा तो गुंड म्हणाला, मला आताच्या आता कारभारी दमानं गाणं ऐकायचंय?”
आता लगेच कार्यक्रम सुरु करायचा आणि कारभारी दमानं गाणं लावायचं. 

यावर सुरेखा पुणेकर बोलत होत्या, ‘हो लावू ना’

हा किस्सा पुढे सांगताना, सुरेखा पुणेकर म्हणतात, तितक्यात आमचे मॅनेजर-निर्माते म्हणजेच बाबा पठाण आले, ते  त्या गुंडाला म्हणाले, ”ओ काय पाहिजे तुम्हाला हो बाहेर”, तर त्यांची बाचाबाची सुरु झाली, तितक्यात त्याने पोटाला पिस्तुल लावलं आणि ”म्हणाला जास्त बोलायचं नाही.”

लगेच मी त्याचा पोटावरचा हात बाजूला करत पुढे आले आणि तो हात बाजूला केला आणि मी त्याला म्हणाले, ”काय पाहिजे दादा तुम्हाला,” असं म्हणत मी त्याच्याशी गोडीत बोलायला लागले. 

इतक्यात त्याने त्या पिस्तुलाचा हात पुढे घेत हवेत गोळीबार केला. हवेत गोळी मारल्यानंतर आम्ही थरथर कापायला लागलो, सर्व कलाकार बाहेर आले. यानंतर मी मेकअप रुममध्ये त्याच्यासमोर  ”पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा हे गायले.”

त्या गुंड माणसाने ते गाणं ऐकलं आणि म्हणाला पटकन आवरा आणि म्हणाला, ”स्टेजवर मला हे गाणं ऐकायचंय.”

तेव्हा सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ”तो समोर असताना मी स्टेजवर हे गाणं गायलं, पण आला का बाण, असं मी या गाण्यात लोकांकडे अॅक्शन करुन म्हणाले नाही, ”हे मी जाणूनबुजून टाळलं कारण,त्याने तिकडून माझ्यावर गोळी झाडायची आणि म्हणायचं, आली का गोळी?”



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *