Headlines

बार्शी अनिसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

बार्शी/प्रतिनिधी- डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या सूत्रधाराचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बार्शी च्या वतीने तहसीलदार बार्शी यांना निवेदन देण्यात आले.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्ट 201210रोजी आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पुण्याच्या सूत्रधारांनाचं काय ? त्यांना कधी पडणार? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई त्वरित करावी. इत्यादी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बार्शी यांच्या वतीने मा. तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा अनिसचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे प्राध्यापक डॉ.प्रा. चंद्रकांत मोरे , प्रा डॉ.अशोक कदम सदस्य राज्य कार्यकारिणी समिती , प्रा. हेमंत शिंदे राज्य सल्लागार समिती ,बार्शी शाखा कार्याध्यक्ष संजय मोरे , सचिव उन्मेश पोतदार , एडवोकेट काकासाहेब गुंड कायदेविषयक सल्लागार , सोलापुर डॉक्टर रामेश्वर कोठावळे विवेक वहिनी सचिव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *