Breaking NewsEducationsolapursolapur university

लोकमंगल महाविद्यालयाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांना निवेदन

मुंबई: श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयात उद्योजकता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवितात. महाविद्यालयाच्या वतीने प्रा .श्रीकांत धारूरकर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय या ठिकाणी माननीय श्री उदय सामंत साहेब यांची सदिच्छा भेट घेतली तसेच कौशल्य विकास व उद्योजकता अभ्यासक्रम  विकसित करण्यासंदर्भात माननीय मंत्री महोदयांना निवेदन सादर केले. लोकमंगल महाविद्यालयाच्या वतीने उद्योजकता महाविद्यालय हे राज्यात उपक्रमशील महाविद्यालय चालविले जाते. संस्थेच्या वतीने आगामी काळात इंक्युबॅशन सेंटर आणि उद्योजकता पार्क या अभिनव संकल्पना राबविल्या जात आहेत याची माहिती श्रीकांत धारूरकर यांनी मंत्री महोदयांना करून दिली.

राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम अतिशय उत्तम प्रकारे विकसित करावा याबाबत निवेदन दिले. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय सुरू करावा तसेच राज्यातील विविध भागातून या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशासाठी यावेत या दृष्टिकोनातून महाविद्यालय , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई संयुक्तिक प्रयत्न करावेत असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले . संस्थेचे मार्गदर्शक माननीय आमदार सुभाषबापू देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतील उद्योजगता महाविद्यालय हे उत्तरोत्तर काळात विद्यार्थ्यांना   कृषी उद्यमशीलता, कृषी पर्यटन, जैवतंत्रज्ञान उद्यमशीलता,  औषधनिर्माण शास्त्रातील उद्यमशीलता, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजगता, विज्ञानावर आधारित   उत्पादन निर्मिती उद्योग व्यवसायाची उभारणी/ बांधणी तसेच व्यावसायिक कौशल्ये, विपणन व्यवस्थापन  आणि बाजारपेठ संशोधन वित्त नियोजन आणि व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे तरुणांना मार्गदर्शन करेल . हा अभ्यासक्रम भविष्यकाळात समाजातील बेरोजगारी नष्ट करणारा तरुणांना अर्थार्जन करून आत्मनिर्भर करणारा निर्माण व्हावा अशी अपेक्षा यानिमित्ताने संस्थेच्या वतीने व्यक्त होत आहे. संस्थेचे अध्यक्ष रोहन जी देशमुख साहेब संस्थेच्या सचिवा अनिता ढोबळे मॅडम प्राचार्य डॉक्टर किरण जगताप प्राचार्य डॉक्टर जितेंद्र बाजारे आदी तज्ञ मंडळी विशेष परिश्रम घेत आहेत. या परिश्रमातून सोलापूर जिल्हा नव्हे तर राज्यात उद्योजकीय कौशल्यची पेरणी व्हावी असे मत प्राचार्य श्रीकांत दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले.

Abs News Marathi

Latest Marathi News | Breaking News in Marathi | ताज्या बातम्या | Live News in Marathi | Marathi News

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!