Headlines

7 व्या वेतन आयोगासाठी आयटक महाविद्यालय शिक्षकेतर संघटनेने केले राज्यव्यापी आंदोलन

बार्शी- प्रतिनिधी- आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतिने आश्वासित प्रगती योजनेचे 12 व 24 वर्षांचे रद्द झालेले शासन आदेश पुर्नजिवीत करून पूर्वलक्षीप्रभावाने लागू करा व 7 व्या वेतन अयोगाचा लाभ विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतरांना तातडीने द्या, 5 दिवसांचा आठवडा, विद्यापीठ कर्मचारी यांना 58 महिन्यांचा फरक या मुख्य मागण्या घेवून राज्यभर उत्सफुर्त अंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली.

अधिक माहिती अशी की, दिनांक 21 जून 2021 पासून महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचार्यांनी मागण्यांचे हातात पोस्टर धरून फोटो काढून ते फोटो आठवडाभर मा.मुख्यमंत्री, मा.उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. संचालक व सहसंचालक उच्च शिक्षण यांना मेल, फेबसबुकला, टिव्टर ला टॅग केले आहेत. या अंदोलनास सोलापूर, रत्नागिरी, रायगड, जळगांव, सातारा, सांगली, मुंबई, पालघर, अहमदनगर, कोल्हापूर, वर्धा, नागपूर,लातूर, धुळे, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, अकोला, नांदेड, नाशिक, गोंदीया या जिल्ह्यातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.  आयटक शिक्षकेतर संघटनेच्या अंदोलनाच्या हाकेला राज्यभर प्रतिसाद दिल्याने हे आंदोलन  शिक्षकेतरांनी यशस्वी केले आहे.

राज्य शासनाने महाविद्यालय शिक्षकेतरांच्या मागण्यांना प्रतिसाद न दिल्यास पूढे सातवा वेतन आयोग मिळेपर्यंत राज्य भरातील महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी खिशाल काळ्या फिती कॉम्रेड अण्णा भाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन करून 18 जूलै 2021 पासून लावण्यास सूरूवात करतील हा अंदोलनाचा पूढील टप्पा असेल अशी माहिती आयटकचे नेते व संघटनेचे अध्यक्ष काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांनी दिली आहे. 

आंदोलन  यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, कॉम्रेड प्रविण मस्तुद,  आरती रावळे, उमेश मदने, विलास कोठावळे, हणुमंत कारमकर,  महेंद्र मेठे, सुधीर सेवकर,  अशोक पवार, गणेश करंजकर,  दत्तात्रय पवार, अल्ताफ होटगी व राज्यभरातील शिक्षकेतरांनी कष्ट घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *