डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा संपन्न

करमाळा/अक्षय कांबळे – विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती च्या निमित्ताने शिव,फुले,शाहू,आंबेडकर जयंती उत्सव समिती करमाळा व मा.नागेश दादा कांबळे मित्र परिवार करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि: 13 एप्रिल रोजी सायंकाळी पार पडल्या.

कोव्हिडं 19 च्या निर्बंधांमुळे बंद पडलेल्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. आणि निर्बंध उठल्यानन्तर करमाळा तालुक्यात प्रथमच भव्य अशा राज्यस्तरीय डान्स स्पर्धा आयोजित करण्याचा मान मा.नागेश दादा मित्र परिवाराला मिळाला.

डॉ.आंबेडकर चौकात ,भव्य अशा रंगमंचावर संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन,तालुक्यातील प्रसिद्ध व्यापारी,श्री.संतोषशेठ गुगळे यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ,डॉ.सौ.कविता कांबळे मॅडम, मा.नागेश दादा कांबळे, मा.लक्ष्मणराव भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

या निमित्ताने डॉ.सौ.कविता कांबळे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील “मिसेस मेडिक्वीन महाराष्ट्र” हा मानाचा किताब पटकावला त्याबद्दल शिव,फुले,शाहू,आंबेडकर जयंती उत्सव समिती व मा.नागेश दादा मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांमुळे स्पर्धेत चुरस झाली.एक से बढकर एक नृत्य अविष्कारांनी उपस्थितांचे मने जिंकली.

अत्यंत चुरशीने झालेल्या या स्पर्धेत कु.ऋतुजा सदाफुलें व स्टेप डान्स अकॅडमी भिगवण यांना विभागून प्रथम क्रमांक मिळाला. अँपॉस्ट्रॉफी डान्स अकॅडमी, जामखेड यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.फ़्रेंडस ग्रुप,अकलूज व आर्यन चव्हाण,पुणे यांना विभागून तृतीय क्रमांक मिळाला.

त्याचबरोबर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 10 स्पर्धकांना उत्तेजनार्थ प्रत्येकी एक ट्रॉफी आणि रोख रक्कम देण्यात आली.

शिव,फुले,शाहू,आंबेडकर जयंती उत्सव समिती व मा.नागेश दादा कांबळे मित्र परिवाराच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेचे संयोजन अक्षय कांबळे,ब्ल्यू स्टार डान्स अकॅडमी करमाळा यांनी केले.

तसेच जयंती उत्सव समितीच्या व नागेश दादा मित्र परिवाराच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply