Headlines

state disaster management directorate finally got a full time director zws 70



मुंबई : राज्यातील नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवून वेळीच मदतकार्य पोहोचविण्यात महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन संचालनालयाला अखेर तब्बल सात महिन्यांनंतर पूर्णवेळ संचालक मिळाला असून आप्पासाहेब धुळाज यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पाऊस, दु्ष्काळ तसेच आपत्तीच्या काळात आपत्ती व्यवस्थापन संचालनालयावर मोठी जबाबदारी असते. राज्यातील कोणत्याही विभागात, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर त्या ठिकाणी तातड़ीने मदत पोहोचविण्याचे, त्यासाठी संबधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे काम राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालनालयाकडून होते. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क ठेवणे, त्यांना आवश्यक मदत पुरविणे, राज्य सरकारला आपत्तीची माहिती देणे, केंद्राशी समन्वय ठेवणे आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संचालकांना सांभाळाव्या लागतात. मात्र या महत्त्वाच्या पदावरील एल. एस. माळी यांच्या बदलीनंतर २१ डिसेंबरपासून संचालनालयाचा कारभार अतिरिक्त कार्यभारावर सुरू आहे.

संचालक पदासाठी सात महिन्यांनंतरही सरकारला योग्य अधिकारी मिळात नसल्याचे संचालनालयाचा कारभार ठप्प झाल्याबाबत लोकसत्ताने (१२ जुलै) प्रकाश टाकला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत संचालकपदी तातडीने सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त आप्पासाहेब धुळाज यांची आपत्ती व्यवस्थापन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार धुळाज यांनी आज नवीन पदभार स्वीकारला.



Source link

Leave a Reply