स्टार खेळाडूची पडली विकेट, लग्नाचे फोटो व्हायरल


Pakistan Cricketer Shan Masood Wife: पाकिस्तानचा स्टार खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नाला पाकिस्तानचे माजी खेळाडू (Shan Masood Marriage) आणि नियमित खेळाडू उपस्थित होते.यामध्ये शाहिद आफ्रिदी आणि शादाब खान यांचा समावेश होता. दरम्यान या स्टार खेळाडूचे गेल्या आठड्याभरापासून लग्नाचे कार्यक्रम सुरु आहेत. या लग्नाची क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा आहे. 

पाकिस्तानचा स्टार खेळाडू शान मसूदने  (Shan Masood) निशा खानशी लग्न केले. 20 जानेवारी रोजी पेशावरमध्ये त्यांचे लग्न थाटामाटात पार पडले आहे. या लग्नाला पाकिस्तानचा माजी खेळाडू  शाहिद आफ्रिदी आणि शादाब खान उपस्थित होता. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्या घरी लग्नाचे कार्यक्रम सुरू होते. त्याच वेळी, 27 जानेवारी रोजी लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.

दरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर शान मसूदने (Shan Masood Marriage) लग्नाआधीचे आणि नंतरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये तो आणि त्याची पत्नी खूपच छान दिसत आहेत. निशा लेहेंग्यात सुंदर दिसत आहे. एका फोटोमध्ये तो आपल्या पत्नीला किस करताना दिसत आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

कारकिर्द 

शान मसूद (Shan Masood Marriage)पाकिस्तान संघाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे. त्याने पाकिस्तानी संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. शान मसूदने पाकिस्तानसाठी 28 कसोटी सामन्यांमध्ये 1500 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 111 धावा आणि 19 टी-20 सामन्यात 395 धावा केल्या आहेत. 

कर्णधार बनवण्याची मागणी

शान मसूदला (Shan Masood) पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी केली जात आहे. नजम सेठी पीसीबीचे अध्यक्ष बनल्यानंतर आणि शाहिद आफ्रिदी हंगामी मुख्य निवडकर्ता बनल्यानंतर, शान मसूदला तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी केली जात आहे. अलीकडेच त्याच्याकडे शादाब खानच्या उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती. त्यात बाबर आझमला हटवण्याची मागणी जोर धरतेय, त्यामुळे शान मसूदच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 

दरम्यान सध्या पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात शान मसूदच्या (Shan Masood) लग्नाची चर्चा सूरू आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. Source link

Leave a Reply