Headlines

शिल्लक रजेचे पैसे, वेतनवाढीतील फरक यापासून एसटी कर्मचारी अद्यापही वंचित | ST employees are still deprived of balance leave pay pay difference mumbai Print News msr 87

[ad_1]

वेतनवाढीतील ४८ समान हप्ते आणि शिल्लक रजेचे पैसे गेल्या तीन वर्षात एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. असे सुमारे दहा हजार निवृत्त कर्मचारी असून यातील काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे.

निवृत्तीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, शिल्लक रजेचे पैसे व वेतनवाढीतील फरक दिला जातो. ही सर्व देणी २०१८ पर्यत महामंडळाकडून निवृत्त अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या पश्चात कुटूंबियांना मिळत होती. परंतु २०१९ पासून वेतनवाढीतील ४८ समान हप्त्यांपैकी काही हप्त्यांची रक्कम आणि शिल्लक रजेचे पैसे निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही. अशा सुमारे दहा हजार निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. समान हप्त्यांपैकी काही हप्ते कर्मचाऱ्यांना देण्यात आले. परंतु अद्यापही मोठी रक्कम मिळालेली नाही. अनेक कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजेची रक्कम ही दोन लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ऊर्वरित रक्कम मिळवण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयात कर्मचाऱ्यांना खेटे घालावे लागत आहेत.

४८ पैकी १२ हप्त्यांची रक्कम अद्यापही मिळालेली नाही –

“मी एसटीत मॅकेनिक म्हणून कार्यरत होतो. २०२१ मध्ये निवृत्त झालो. ४८ पैकी १२ हप्त्यांची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. ती ५९ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, तर २३४ दिवसांची रजा शिल्लक असून त्याची रक्कमही ३ लाख ४८ हजार आहे. याबद्दल एसटीच्या मुख्यालयाकडेही विचारणा केली असता २०१९ पासून कर्मचाऱ्यांची देणी अद्याप देत असल्याचे सांगण्यात आले आहे.” असं निवृत्त एसटी कर्मचारी अनिल पाटील यांनी सांगितलं आहे.

शिल्लक रजेची रक्कम ही २ लाख ८० हजार रुपयांपर्यंत –

“एसटीत वाहन परीक्षक म्हणून कार्यरत होतो. माझे १० हप्ते मिळणे बाकी असून ती रक्कम साधारण ३० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. शिल्लक रजेची रक्कम ही २ लाख ८० हजार रुपयांपर्यंत आहे.” असं निवृत्त एसटी कर्मचारी चंद्रसेन गडदाकी म्हणाले आहेत.

नव्या सरकारने यात लक्ष घालावे –

तसेच, “गेल्या तीन वर्षापासून प्रशासन व सरकार दरबारी खेटे घालूनसुद्धा निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची थकित रक्कम मिळालेली नाही. नव्या सरकारने यात लक्ष घालून शिल्लक रजेचा पगार आणि युती सरकारच्या काळात झालेली वेतनवाढ यांचे प्रलंबित हप्ते द्यावेत.” अशी मागणी महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

करोनामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका –

तर, “शिल्लक रजेचे पैसे आणि वेतनवाढीतील ४८ हप्त्यांची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यास उशीर होत आहे, ही बाब खरी आहे. परंतु गेल्या दोन वर्षात करोनामुळे एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आणि त्यामुळे अनेकांची देणी राहिली. तरीही ही देणी कर्मचाऱ्यांना हळूहळू देत आहोत.” असं एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले आहे.



[ad_2]

Source link

One thought on “शिल्लक रजेचे पैसे, वेतनवाढीतील फरक यापासून एसटी कर्मचारी अद्यापही वंचित | ST employees are still deprived of balance leave pay pay difference mumbai Print News msr 87

  1. २०१९ साली कोरोना नसताना सेवनिवृत्तांचे रजा रोखीकरण व कराराचे हप्ते का दिले नाहीत?ताबडतोब एक रकमी रक्कम व्याजासह देणे आवश्यक आहे परंतु जाणूनबुजून टाळाटाळ करून ती रक्कम इतरत्र वापरली जात आहे.सेवनिवृत्ताची सदरची रक्कम फुकट वापरण्यात येते असा कोणताही अधिकार एसटी महामंडळाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *