Headlines

शाहरुख – गौरीचं लग्नानंतर जंगी रिसेप्शन, अखेर Unseen फोटो समोर

[ad_1]

मुंबईः अभिनेता शाहरूख खानला किंग ऑफ रोमान्स म्हणून ओळखलं जातं मात्र खऱ्या आयुष्यातील त्याची स्टोरी फार वेगळी आहे. गौरीचा होकार मिळवण्यासाठी शाहरूख खानला मात्र बरीच मेहनत घ्यावी लागलीय. पण शाहरुखने कधीही हार मानली नाही. अखेर गौरी आणि शाहरुखचं लग्न झालं. आता अनेक वर्षांनंतर गौरी आणि शाहरुखच्या रिसेप्शनचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. 

लग्नानंतर शाहरुख खान आणि गौरीने त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या मित्रांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या रिसेप्शनचे न पाहिलेले फोटो शाहरुख खान आणि गौरीच्या फॅन पेजने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत तसेच आश्चर्य व्यक्त करत आहेत.

गौरी शाहरुखचं पहिलं प्रेम होतं, तो गौरीबद्दल खूप सकारात्मक होता. गौरीचं इतर मुलांशी बोललेलंही शाहरूखला आवडत नसे. जेव्हा शाहरुख खानने गौरीला पहिल्यांदा प्रपोज केलं तेव्हा गौरीने त्याला नकार दिला, कारण गौरीच्या पालकांनाही शाहरुख आवडत नव्हता. 

प्रिती झिंटाच्या चॅट शोमध्ये, शाहरुख खानने सांगितले मुंबईतल त्याने गौरीला लग्नासाठी प्रपोज केले आणि गौरीने पुन्हा एकदा त्याचं प्रपोज फेटाळलं. शाहरुख खानने प्रिती झिंटाला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले की, ‘माझ्या आईचे एका वर्षानंतर निधन झाले, तेव्हा गौरीला माझ्यासाठी खूप वाईट वाटले. मग गौरीने लग्नासाठी होकार दिला आणि म्हणाली लग्न करूया..

गौरीला मी अभिनेता व्हावं असं वाटत नव्हतं. माझ्या दिग्दर्शकांनी मला लग्न न करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘बॅचलर हिरोची फॅन फॉलोइंग जास्त आहे’, पण मी म्हटलं, खूप मेहनतीने गौरीला लग्नासाठी तयार केलंय आता लग्न करावं लागेल. मात्र, या सगळ्यानंतर गौरी आणि शाहरुख खानने 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *