‘श्रीवल्ली’च्या मृत्यूवर अखेर मोठी माहिती समोर, चाहत्यांनाही धक्का


मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना  (Rashmika Mandanna) यांच्या मध्यवर्ती भूमिका असणारा ‘पुष्पा’ हा चित्रपट तुफान गाजला. बॉक्स ऑफिस कमाईचे सर्व विक्रम या चित्रपटानं तोडले. दाक्षिणात्य चित्रपट असतानाही त्याला विविधभाषी प्रेक्षकांकडून कमाल लोकप्रियता मिळवली. 

आता म्हणे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरु असल्याचंही म्हटलं जात आहे. पण, त्यातच एकाएकी चर्चा समोर आली ती म्हणजे ‘श्रीवल्ली’च्या मृत्यूची. (Pushpa 2 srivalli rashmika mandanna movie death)

काय म्हणता, श्रीवल्लीचा मृत्यू? कसं शक्यंय? काय वेड लागलंय का… असं अनेकजण म्हणाले. अर्थात चाहत्यांची संख्या त्यात जास्त होती. ही चर्चा होण्याचं कारण ठरला  ‘पुष्पा 2’ (Pushpa-2). 

असं म्हटलं गेलं की, पुष्पा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात श्रीवल्लीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी ही बातमी मोठीच ठरली. पण, आता मात्र निर्मात्यांनीच पुढे येत चित्र अधिक स्पष्ट केलं. 

फहाद फासिल साकारत असणाऱ्या पात्राकडून श्रीवल्लीला मारलं जाणार असल्याच्या सर्व चर्चा त्यांनी धुडकावून लावल्या. तेव्हा आता या चित्रपटाचा दुसरा भाग नेमका कसा असेल याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

‘पुष्पा-द राइज’ या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर संहितेत काही महत्त्वाचे बदल करण्याची गरज पुढे आली. नवी कथा लिहिण्याची सुरुवातही झाली, पण नंतर माहिती समोर आली की तयार कथेवरच काम करत ती पुढे नेण्यात येणआर आहे. त्यामुळं आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. 

जुलै महिन्याच्या अखेरीस ‘पुष्पा-2’च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बरेच प्रसिद्ध आणि मोठे कलाकार या चित्रपटातून झळकणार आहेत. काय मग, तुम्हीही आहात ना उत्सुक?  Source link

Leave a Reply