Headlines

श्रीकांत देशमुख लैंगिक अत्याचार प्रकरणाचा अहवाल सोलापूर पोलिसांनी सात दिवसात महिला आयोगाकडे अहवाल सादर करावा : रुपाली चाकणकर | Report of Srikant Deshmukh sexual assault case Solapur police should submit report to Women’s Commission within seven days Rupali Chakankar amy 95

[ad_1]

भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबधित महिलेवर लैंगिक अत्याचाराची घटना सोलापूर येथे घडली होती. त्यामुळे तो गुन्हा डेक्कन पोलिसांनी तात्काळ सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” पीडित महिलेने महिला आयोगाकडे १५ तारखेला तक्रार केली होती.पण त्यावेळी कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली नव्हती. त्यानंतर पीडित महिलेने १७ तारखेला डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रारी दिली. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसानी गुन्हा दाखल केला.पण त्या महिलेवर सोलापूर येथे सुरुवातीला अत्याचार झाला होता.त्यामुळे डेक्कन पोलिसानी तो गुन्हा सोलापूर पोलिसांकडे वर्ग केला.या प्रकरणाचा सात दिवसाच्या आतमध्ये तपास करून कारवाईचा अहवाल महिला आयोगा समोर सादर करण्याचे आदेश सोलापूर पोलिसांना देण्यात आले आहेत” अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली.

रायगड येथील एका पीडित महिलेने भाजपचे जिल्हाध्यक्ष महेश मोरके यांच्या विरोधात अत्याचार बद्दल महिला आयोगाकडे तक्रार केली होती. यापुर्वी संबधीत पोलिस स्टेशनला कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.पण त्यांच्याकडून अहवाल सादर केला गेला नाही.त्यामुळे आज संबधीत पोलिस स्टेशनला स्मरण पत्र पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग,आपल्या दारी’ हा उपक्रम राज्यातील अनेक भागात घेण्यात आला.या उपक्रमा अंतर्गत महिलांच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर,जिल्हा आणि पिंपरी चिंचवड या भागातील महिलांच्या प्रश्ना संदर्भात तीन दिवसीय जनसुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये आज पुणे शहरातील ९१ तक्रारी बाबत सुनावणी झाली. त्यामध्ये ३९ वैवाहिक,२० मालमत्ता,१८ सामाजिक आणि १४ इतर तक्रारी होत्या. बलात्कार,आर्थिक फसवणूक,छेडछाड या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *