…आणि भिंती बोलू लागल्या

सांगली – सुजाण नागरिक बनण्यासाठी मुलांच्या मनात बालवयापासूनच संस्कार मुल्ये रुजवली गेली पाहिजेत व शिक्षणातून सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, भविष्यातील समर्थ व सक्षम नागरिक घडले पाहिजेत, यासाठी कडेगांव तालुक्यातील हणमंत वडीये येथे येरळामाई जनसहयोग फाउंडेशनच्या वतीने ‘बोलक्या भिंती’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.(sangali)

देशाची शिक्षण पद्धती ही देशाची मूल्ये जपणारी असावी आणि ती काळानुसार बदलावी. बदलाची सुरुवात ही आपल्या गावापासूनच व्हावी, यासाठी हणमंत वडीये व गावच्या डागंचा मळा, मंडले वस्ती, मस्के वस्ती, कोकरे वस्तीवरील रस्त्याच्या दुतर्फा दर्शनी भागातील भिंतीवर सुचक चित्रे, सुविचार, श्लोक, बोधवाक्य यांचे रेखाटन केले आहे.‌ तसेच नागरिकांना उपयोगी मार्गदर्शनपर सूचनांचे रेखाटन करून गावातील अनेक भिंती बोलक्या केलेल्या आहेत.

येरळामाई जनसहयोग फाउंडेशनच्या कार्यकारिणीच्या वार्षिक सर्व साधारण बैठकीत फाऊंडेशनचे खजिनदार कु. प्रदीप मस्के (मेकॅनिकल इंजिनिअर) यांनी ‘बोलक्या भिंती’ या उपक्रमाची संकल्पना मांडली. तसेच अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक मोरे ( सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख, डी वाय पाटील कॉलेज.पुणे) यांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने कसा राबवता येईल, यावर सुरवातीपासूनच सखोल मार्गदर्शन केले. फाउंडेशनच्या कार्यकारिणीचे सदस्य पवन मोरे साहेब (पी.एस्.आय. क्राईमब्रॅंच डिपार्टमेंट, नागपूर शहर) यांनी हा उपक्रम लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठी आग्रही भूमिका घेत या उपक्रमाची जबाबदारी स्विकारली आणि हा उपक्रम सर्वोतोपरी पुर्णत्वास नेण्यासाठी पुर्ण वेळ देऊन काम करवून घेतले.

गावात ‘बोलक्या भिंती’ हा उपक्रम राबविण्याचे काम चालू असताना हणमंत वडीये या गावातील जेष्ठ नागरिक प्रा. बी. एन्. मोरे सर, कार्यकारिणीचे सहसचिव प्रा. शंकर माने (एन् सी सी प्राध्यापक कॅप्टन, के.बी.पी कॉलेज, इस्लामपूर.), सदस्य बाबासो कोकरे, सचिव श्री. सुभाष आनंदा मंडले, महिला अध्यक्ष सौ. मयुरा जाधव, कार्याध्यक्ष धिरज जाधव, सदस्य अॅड. स्वप्निल जाधव, जोतिराम देशमुख, उद्धव मोरे, विजय मस्के, सौ. गितांजली मोरे यांच्या मार्गदर्शनपर सूचना व हणमंत वडीये गावच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने ‘बोलक्या भिंती’ हा उपक्रम गाव, वस्त्यांवर यशस्वीपणे राबविण्यात आला.

Leave a Reply