स्पीडबोटीने फिरायला गेलेल्या अभिनेत्रीचा अपघात; मृत्यूच्या बातमीनं एकच खळबळ


मुंबई : आवड म्हणून फिरायला गेलेल्या अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्रीची आवडच तिच्या जिवावर बेतली आणि तिला आपले प्राण गमवावे लागले. अभिनेत्रीसोबतच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला. अभिनेत्री एका स्पीडबोटीवरून पाण्यातून जात होती मात्र या दरम्यान असं काहीतरी घडलं, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, निदा (Nida Patcharaweeraphong) 24 फेब्रुवारी रोजी आपल्या मित्रांसोबत बोटीतून चाओ फ्राया नदीतून जात होती. थाई अभिनेत्री निदा पचारावियरफोंग बोटीच्या मागच्या बाजूला बसली होती. तेव्हा ती अचानक पाण्यात पडली, परंतु हे तिच्या कोणत्याही मित्राच्या लक्षात आले नाही.

20 मिनिटे पाण्यात अभिनेत्रीचा शोध घेण्यात आला

काही काळाने निदा बोटीत नसल्याचे लक्षात येताच तिच्या मित्रांनी स्पीडबोटीच्या सहाय्याने सुमारे 20 मिनिटे पाण्यात तिचा शोध घेतला. परंतु ती सापडली नाही, ज्यामुळे अखेर तिच्या मित्रांना स्थिनिकांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर 30 लोकांची टीम त्या परिसरात शोध घेण्यासाठी पाठवण्यात आली.

निदाचा (निदा पचरवीराफोंग) भाऊ देस देजाब देखील तिच्या या शोध आणि बचाव मोहिमेत सामील झाला. यावेळी त्याला पाण्यात काहीतरी तरंगताना दिसले. तेव्हा त्यांना एक महिलेचं शरीर सापडलं, त्यानंतर अभिनेत्रीच्या भावाने तिची ओळख पटवली.

निदाचा भाऊ देस देजाब म्हणाला- “कुटुंबातील प्रत्येकजण ज्या वेदनातून जात आहे ते असह्य आहे. मी माझ्या बहिणीवर खूप प्रेम करत होतो आणि ती देखील आम्हाला खूप आनंद द्यायची. मी प्रत्येकाच्या प्रयत्नांबद्दल आभार मानू इच्छितो”

या सगळ्यात निदाच्या आईने एक खुलासा केला, ज्यामुळे ही घटना अपघात नसुन अपराध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. निदाच्या आईचे म्हणणे होते की, ‘निदा एक चांगली स्वीमर आहे, तिला चांगले पोहोता येते, त्यामुळे पाण्यात पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला यावर माझा विश्वासच बसत नाहीय.’ पोलिस या घटनेचा संपूर्ण तपास घेत आहेत.Source link

Leave a Reply