भारतीय उद्योजकाने सांगितली Andrew Symonds बाबत खास गोष्ट


मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने क्रिक्रेट वर्तुळात शोककळा पसरलीय. तर अनेक दिग्गज क्रिकेटपटू सोशल मीडियावर ट्विट करून अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहत आहे.

त्यात आता भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी ट्विट करत अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली वाहिलीय.अदानी यांनी वर्ल्ड कप दरम्यानच्या सायमंड्सच्या तुफान खेळीची आठवण सांगितली.  

भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे देखील क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांनी अँड्र्यू सायमंड्सचीही निधनावर दु;ख व्यक्त करत त्यांच्य़ा क्रिकेट विश्वातील कामगिरीचे कौतूक केलेय.  
   
गौतम अदानींचे ट्विट 

गौतम अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “अँड्र्यू सायमंड्सच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसलाय.ज्यांनी मैदानात खेळाने आणि मैदानाबाहेर आपल्या व्यक्तिमत्वाने वेगळ वलय निर्माण केले.  विश्वचषकातील त्याची चमकदार फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि १४३ धावांची शानदार खेळी विसरता येणार नाही. मार्चमध्ये जसा शेन वॉर्न लवकर निघून गेला तसाच सायमंड्सचा डावही लवकर संपला, अशा शब्दात त्यांनी दु;ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.  

नेमका कसा झाला होता सामना ? 

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.यावेळी प्रथम फलंदाजीस उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला   सुरुवातीसा मोठे धक्के बसले आणि संघाने ८६ धावांवरच चार विकेट गमावल्या. 

अँड्र्यू सायमंड्स बॅटींगला आल्यावर सायमंड्सने कर्णधार रिकी पाँटिंगसह पहिला डाव सांभाळला आणि नंतर पाकिस्तानी गोलंदाजांवर तुटून पडले. अँड्र्यू सायमंड्सच्या ज्या खेळीबद्दल गौतम अदानी बोलले ती खेळी पाकिस्तानविरुद्ध आली. ज्यामध्ये त्याने संकटाच्या वेळी 125 चेंडूत 143 धावा केल्या, ज्यात 18 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

अँड्र्यू सायमंड्सच्या स्फोटक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 310 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला केवळ 228 धावा करता आल्या.  आणि ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला. Source link

Leave a Reply