साऊथच्या सुपरस्टारचं युक्रेनमध्ये कोण आहे? ज्याला तो करतोय मोठी मदत


मुंबई : युक्रेन आणि रशिया यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. युक्रेनमधून अनेकांनी स्थलांतर केलं आहे, तर काहींनी न घाबरता या परिस्थितीला तोंड देण्याचा निर्णय घेतला आहे.

तेथील अनेक राजकीय नेत्यांनी बंदूक हातात घेत देशाला वाचवण्यासाठी जमेल ते प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केला आहे. अशात आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यात युक्रेनमधील एक सैनिक साऊथ स्टारचे आभार मानत आहे.

दक्षिण भारतीय अभिनेता रामचरणचा RRR हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सोशल मीडियावर त्याचं कौतुक केलं जात आहे. आता त्यांने असे काही केलं आहे, ज्यामुळे रामचरणने सगळ्यांच मन जिंकलं आहे. अभिनेत्याने युक्रेनमध्ये राहणाऱ्या त्याच्या एका बॉडीगार्डला मदत केली आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आरआरआर चित्रपटाच्या युक्रेन शेड्यूलमध्ये अभिनेत्याचा वैयक्तिक बाडीगार्ड तिथे होता. त्याने अभिनेत्याचे आभार मानले आहेत.

व्हिडिओमध्ये रस्टी म्हणतो – हॅलो. माझे नाव रस्टी आहे. रामचरण युक्रेनमधील कीवमध्ये शूटिंग करत होते तेव्हा मी त्याचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होतो. काही दिवसांपूर्वी रामचरणने माझ्याशी संपर्क साधला.

” त्याने माझ्या आणि माझ्या कुटुंबाबद्दल विचारले. “त्याने मी तुला मदत करू शकतो का? असा प्रश्न मला विचारला. मी त्याला सांगितलं की, मी सैन्यात भरती होणार आहे. रामचरणने माझ्या पत्नीला पैसे पाठवले आणि मला माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यास सांगितले. हे त्यांचे मोठेपण आहे.”Source link

Leave a Reply