Headlines

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी कर्णधारपदाचा होता दावेदार, संघातही मिळालं नाही स्थान

[ad_1]

Team India Squad for SA Series: IPL 2022 नंतर लवकरच टीम इंडिया (Team India) दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) 5 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली आहे. आयपीएलमध्ये (IPL 2022) दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना निवड समितीने पसंती दिली आहे. 

पण या मालिकेत एका धडाकेबाज फलंदाजाला मात्र संधी मिळू शकलेली नाही.  निवड समितीच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.

‘या’ खेळाडूकडे निवड समितीचं दुर्लक्ष
आपण ज्या  खेळाडूबद्दल बोलतोय त्या धडाकेबाज खेळाडूचं नाव आहे शिखर धवन (Shikhar Dhavan). IPL 2022 मध्ये धवनने दमदार कामगिरी केली आहे. श्रीलंका मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पुन्हा एकदा धवनकडे टीम इंडियाचं कर्णधारपद सोपवले जाईल, अशी चर्चा होती, पण कर्णधारपद मिळणं तर दूरच, संघातही धवनला संधी मिळालेली नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत धवनसारखा अनुभवी खेळाडू संघासाठी महत्त्वाचा ठरू शकला असता, असं क्रिकेट जाणकारांचं म्हणणं आहे.

कर्णधार म्हणून चांगली कामगिरी
शिखर धवनने याआधीही टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर पाठवण्यात आला होता.  गेल्या संपूर्ण हंगामात धवनची कामगिरी चांगली राहिली आहे. आयपीएल 2022 मध्येही धवनने 13 सामन्यात 421 धावा केल्या आहेत. पण यानंतरही त्याला संघात पुनरागमन करता आलेलं नाही. 

केएल राहुलकडे कर्णधारपद
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलची (KL Rahul) निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी शिखर धवन किंवा हार्दिक पांड्या यांची कर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते, अशी चर्चा होती.

टी20 सीरीजसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *