Sonam kapoor जुळ्या मुलांची आई होणार; कुणी दिले संकेत?


मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सोनम कपूर आई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. प्रेग्नेंसीच्या चर्चांना आता सोनम कपूरने पूर्णविराम दिला आहे.

तिने पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत सोनमने ती गरोदर असल्याचं सगळ्यांना सांगितलं आहे. 

पण सोनमने गोड बातमी दिल्यानंतर तिच्या बेस्ट फ्रेण्डने एक खास कमेंट केली आहे. जी सगळ्यांचे लक्षवेधून घेत आहे. करिना कपूर खानने सोनमला शुभेच्छा दिल्या आहेत. पण तिने लिहिलेली कमेंट वेगळेच संकेत देत असल्याचं बोललं जात आहे. 

ही गोड बातमी सगळीकडे पसरायला वेळ लागला नाही. वाणी कपूर, करीना कपूर, अंशुला, खुशी, जान्हवी कपूरसह अनेक सेलिब्रिटींनी सोनमचे अभिनंदन केले आहे.

करीना आनंद रोखू शकली नाही आणि तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,’ मी तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे, मुलांसोबत खेळण्याची प्रतीक्षा करू शकत नाही…’

करिनाने कमेंटमध्ये ‘मुलांसोबत खेळण्याची प्रतीक्षा करू शकत नाही’ असं लिहिल्याने सोनम एक नाही तर दोन मुलांना जन्म देणार का? अशा आशयाची चर्चा सुरु झाली आहे. 

करिनाने न कळतच ही कमेंट लिहिलेल्याने आणखी एक बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचली असल्याचं बोललं जात आहे. या चर्चांमुळे सोनम जुळ्या मुलांना जन्म देऊ शकते असं अनेकांना वाटू लागलं आहे. त्यामुळे सोनमच्या पोस्टनंतर आता करिनाची ती प्रतिक्रिया सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे.Source link

Leave a Reply