Headlines

Sonali Phogat Murder mystery ला वेगळं वळण, 5 व्या आरोपीकडून मोठी कबुली

[ad_1]

मुंबई : टिकटॉक स्टार आणि बीजेपी नेता सोनाली फोगट (Sonali Phogat ) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) गोव्यात निधन झालं. सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  सोनाली यांच्या मृत्यूप्रकरणी पाचव्या  आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गोवा पोलिसांनी आरोपी रामा मांडरेकरला (Rama Mandrekar) अटक केली आहे. मांडरेकरवर पॅडलर दत्तप्रसाद गावकरला (Dattaprasad Gaonkar) ड्रग्ज पोहोचवल्याचा आरोप आहे.  त्यानंतर गावकरने सुधीर सांगवानला ड्रग्ज विकले.

या प्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत ज्या पाच जणांना अटक केली आहे. त्यात गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटचा मालक एडविन न्युन्स, ड्रग्ज तस्कर दत्त प्रसाद गावकर आणि रामा मांडरेकर याशिवाय मुख्य आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांचा समावेश आहे.

पोलिसांनी शनिवारी कर्लीज रेस्टॉरंटच्या टॉयलेटमधून सिंथेटिक ड्रग्स जप्त केले होते, त्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करण्यात आली होती. त्याचवेळी ड्रग पॅडलर दत्तप्रसाद गावकर याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. 

पोलिसांनी शनिवारी दोन मुख्य आरोपींसह चार आरोपींना गोव्याच्या म्हापसा कोर्टात हजर केले होते, तेथून त्यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आता रामा मांडरेकरने दिलेल्या माहितीमुळे प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. 

सोनाली मृत्यू प्रकरणातील आरोपींना मिळणार शिक्षा  – गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत
शनिवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सोनाली फोगट हत्याकांडप्रकरणी आरोपींना गोवा पोलीस नक्कीच शिक्षा देतील असे सांगितले. प्रमोद सावंत म्हणाले, “पहिल्या दिवसापासून तपासात पूर्ण सहकार्य केलं जात आहे आणि त्यात जो कोणी सहभागी असेल, त्यांना गोवा पोलिस नक्कीच शिक्षा करतील आणि आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याचा कसून तपास सुरू आहे.”

दरम्यान, सोनाली यांच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे अनेयक प्रश्न उपस्थितीत होत आहे. सोनाली यांचं निधन झालं नसून, त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *