Headlines

Sonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे ‘हा’ क्रिकेटर?

[ad_1]

Shoaib Akhtar had Crush On Sonali Bendre : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही सोनालीच्या चाहत्यांची संख्या ही कमी झालेली नाही. सोनालीचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. त्यात पाकिस्तानचे देखील नाव आहे. पाकिस्तानमध्ये तर त्यांचे लाखो चाहते आहेत. एकदा तर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर त्यानं सोनाली बेंद्रे विषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. शोएब अख्तरनं खुलासा केला होता की  त्याला तिचे अपहरण करायचे आहे. 

रिपोर्ट्सनुसार, शोएब अख्तरला सोनाली बेंद्रेवर क्रश होतं आणि एका टॉकशोमध्ये त्यानं म्हटलं होतं की सोनालीला प्रपोज करण्यासाठी तो काहीही करेल. जर तिनं नकार दिला तर तो तिचं अपहरण करेल. शोएब हे सोनालीचे चाहते आहेत. इतकंच काय तर शोएब सोनालीवर प्रेम देखील करायचे. शोएब सोनालीचा एक फोटो त्यांच्या वॉलेटमध्ये ठेवायचे. शोएबच्या टीम मेट्सला देखील त्याच्या भावनांविषयी माहित होते. 

हेही वाचा : घशामध्ये गाठी, डॉक्टर म्हणाले ‘तुझा कायमचा….’, प्रसिद्ध Actress चा धक्कादायक खुलासा, चाहत्यांना विनंती

टाइम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, शोएबनं याविषयी बोलत सांगितले की सोनालीला कधी भेटलो नाही, ‘मी कधीच तिचा फॅन नव्हतो. मी एक-दोनवेळा तिचे चित्रपट पाहिले असतील, पण मी कधीच तिचा चाहता नव्हतो. मी तिला चित्रपटातच पाहिलं होतं आणि ती खूप सुंदर स्त्री आहे. ती आजारी असताना तिचा संघर्ष मी पाहिला आहे. तिनं हिंमत्त दाखवली आणि ब्रेव्ह महिलेप्रमाणे त्यातून बाहेर पडली.’ 

पुढे शोएब म्हणाला, तिनं स्वत: शी संघर्ष केला आणि त्यानंतर मी तिचा चाहता झालो. एका महिलेल्या इतकं ब्रेव्ह पाहून मला खूप चांगलं वाटलं होत. तिनं दुसऱ्या महिलांना रस्ता दाखवला. मला ती आवडायची हे म्हणणं चुकीचं आहे. माझ्या रूममध्ये तिचं पोस्टर होतं हे बोलणं पण चुकीचं आहे. माझ्या रुममध्ये पोस्टर होता पण तो इमरान खानचा होता. ते एकमेव क्रिकेटर आहेत ज्यांना मी माझा आदर्श समजतो.’ 

सोनालीच्या आजाराविषयी बोलायचे झाले तर…

2018 साली सोनालीला मेटास्टेटिक कर्करोगाचे निदान झाले. उपचारानंतर सोनाली आता ठीक आहे. सोनाली सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याविषयी सांगताना दिसते. सोनालीच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिनं गोल्डी बहल यांच्याशी लग्न केलं आहे आणि त्यांना एक मुलगा असून रणवीर असं त्याच नाव आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *