Headlines

solapur yuvasena criticized shinde camp mla shahaji bapu patil ass 97

[ad_1]

पंढरपूर : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी प्रकरणात सर्वाधिक चर्चा झाली ती सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल” या डायलॉगची. यानंतर शहाजीबापू पाटील यांनी अनेक मुलाखतीदरम्यान बायकोला साडीही घेऊन दिली नाही, असं म्हटलं होते. यावरुन आता युवासेनेने शहाजीबापू पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

“बापू मतदार संघात लक्ष द्या, महाराष्ट्र करमणूक दौरा बंद करा, ‘काय दारू काय चकणा, काय ते ५० खोके समदं कसं ओके,’ बापू तुमच्यासाठी मातोश्रीवर नोकरी भेटेल,” असे बॅनर घेऊन युवासेनेने शहाजी बापू पाटील यांच्याविरोधात माळशिरसमध्ये आंदोलन केलं आहे. याबाबतची पोस्ट सोलापूर युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी आपल्या समाजमाध्यमावर टाकली आहे. ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय म्हणाले होते शहाजी बापू पाटील?

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल” हा डायलॉग फेमस झाल्यानंतर अनेक ठिकाणी शहाजी बापू यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. तेव्हा त्यांनी खूप गरीबीत राहत आहे. किती दिवस झालं, बायकोला साडीही घेऊ शकलो नाही, असं म्हणाले होते. तसेच, मागील काही दिवसांपासून शहाजी बापू पाटील हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळेच आता युवासेनेने शहाजी बापू पाटील यांच्याविरोधात रान उठवल्याचं पहायला मिळत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *