सोलापूर महानगरपालिकेत सामूहिक राष्ट्रगीत गायन

सोलापूर/ एबीएस न्यूज नेटवर्क – केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार हार तिरंगा उपक्रमा संदर्भात 9 ऑगस्ट रोजी एकाच वेळेला राष्ट्रगीत गायन होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते.त्याच अनुषंगाने 9 ऑगस्ट रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सकाळी 11 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायनाचे आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे करण्यात आले होते.

सोलापूर महानगरपालिकेत सामूहिक राष्ट्रगीत गायन

यावेळी महापालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांच्या अधिपत्याखाली राष्ट्रगीत गायन घेण्यात आले. यावेळी कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, संगणक विभागाचे प्रमुख स्नेहल चपळगावकर, भूमलिंगम रापेल्ली,महेश क्षीरसागर, पंडित वडतीले आदि सह सर्व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.त्याचबरोबर या हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या संगणक विभाग, मुख्य लेखापाल विभाग, मिळकतकर विभाग, कामगार कल्याण जनसंपर्क विभाग, अतिक्रमण विभाग, नगर अभियंता विभाग,नगर रचना विभाग ,महापालिकेचे सर्व शाळेत त्याचबरोबर महापालिकेचे सर्व विभागीय कार्यालय या ठिकाणी एकाच वेळेला आज सकाळी 11 वाजता हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. याप्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply