Headlines

दडशिंगे येथील विविध विकास कामास मंजुरी

बार्शी/प्रतिनिधी – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नाने दडशिंगे येथील 25-15 या हेड खाली विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडपाचे बांधकाम करणे या कामासाठी 5 लाख रुपये , ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधा या जनसुविधा या हेड मधून ग्रामपंचायत परिसर काँक्रेट करणे यासाठी 2.5 लाख रुपये. ग्रामीण तीर्थक्षेत्राचा भौतिक विकास करणे या तीर्थ क्षेत्र विकास योजनेतून बाळपीर तीर्थ क्षेत्र क वर्ग देवस्थानास दर्शन सभामंडप बांधणे 4 लाख रुपये तसेच जिल्हा नियोजन च्या जि प शाळा खोली दुरुस्ती साठी 2.9 लाख रुपये अस्या विविध कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे.

सदर कामाच्या निविदा प्रकिया पूर्ण करून लवकरच कामास सुरुवात होईल अशी माहिती शिवसेना शाखा प्रमुख माजी उपसरपंच पांडुरंग घोलप यांनी दिली यावेळी अजून गावातील विविध कामासाठी पाठपुरावा चालु असून लवकरच अजून बरीच विकास कामं मंजुरी होतील अशी माहिती सरपंच सचिन गोसावी यांनी दिली. वरिल विकास कामामुळे गावातील नागरिकांना भौतिक सुविधांचा लाभ होईल या वरील कामाच्या मंजुरी साठी खासदार ओमराजे निंबाळकर ,शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग घोलप यांचे विशेष प्रयत्न राहिलेले आहेत. विविध विकास कामाच्या मंजुरी मूळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल आहे तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply