Headlines

सोशल मीडियावर KK ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची; फोटो शेअर करत म्हणाला होता…

[ad_1]

कोलकाता : प्रसिद्ध बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. केके आज आपल्यात नाहीये. त्याच्या मृत्युने बॉलिवूड कलाकारही हळहळले आहेत. दरम्यान यानंतर के.केच्या इन्स्टाग्रामवरील शेवटच्या फोटोंची फार चर्चा होताना दिसतेय.

लाईव्ह कॉन्सर्टचे फोटो केले होते शेअर

केकेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाईव्ह शोचे दोन फोटो शेअर केले होते. यासोबतच त्याने कॅप्शन दिलं होतं की, नजरूल मंचवर आज भेटूया…विवेकानंद कॉलेज…सर्वांना खूप खूप प्रेम….!

मिळालेल्या माहितीनुसार, केकेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. कॉन्सर्टनंतर त्याच्या तब्येत बिघडल्याची बातमी आली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. 

दरम्यान केकेच्या मृत्यूचं खरं कारण समोर येण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, पोस्टमार्टनंतरचं त्याच्या मृत्यूचं योग्य कारण समोर येऊ शकतं. तर समोर आलेल्या माहितीनुसार, केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. यामुळे केकेच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. 

हॉटेलमधील शिफ्ट मॅनेजरची चौकशी

न्यू मार्केट पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी शिफ्ट मॅनेजरची चौकशी केलीये. केके हॉटेलमध्ये कधी आला? त्याच्यासोबत कोण होतं? हॉटेलमध्ये त्याच्या खोलीत कोण आलं? याची माहिती पोलिसांना हवीये. 

याशिवाय केकेने काय खाल्लं होतं हे जाणून घेण्यासाठी पोलीस शिफ्ट मॅनेजरशी बोललेत. त्याची संपूर्ण माहिती पोलीस घेत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *