सोशल मेडीयावर अश्लिल भाषा वारून व्हीडीओ प्रसारीत करून समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थीती बिघड कारणीभुत ठरणाऱ्या थेरगाव क्वीनला अटक वाकड पोलीसांची कारवाई

पुणे – मा. श्री. कृष्ण प्रकाश सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी सोशल मेडीया साईटवर आक्षेपार्य पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सोशल मेडीया सेल तयार करून त्यामार्फत झिरो टॉलरन्स अंतर्गत, तसेच Thergaon QueenN या नावाचे अकाऊंटव्दारे व्हायरल झालेले अश्लिल व्हीडीओवर कायदेशीर कारवाई करणेसंदर्भात दिलेल्या सुचना प्रमाणे. डॉ विवेक मुगळीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना सदरबाबत सुचना दिल्या होत्या.

दि. २९/०१/२०२२ रोजी संगिता गोडे महिला पोलीस उप निरीक्षक यांनी तक्रार दिली की, Thergaon QueenN या नावाचे अकाऊंट चालविणारी मुलगी नामे साक्षी हेमंत श्रीश्रीमल रा. थेरगांव, पुणे हिने तिचे सोबत असणारा मुलगा नामे कुणाल कांबळे रा. गणेशपेठ, ( पुर्ण नांव पत्ता माहित नाही) व एक मुलगी साक्षी राकेश कश्यप रा.. चिंचवड, पुणे. असे तिघांनी मिळुन सार्वजनिक ठिकाणी अश्लिल भाषा व शब्द वापरलेले तसेच धमकीवजा अनेक व्हिडीओ तयार करून ते सोशल मिडीयामध्ये प्रसारित केले. त्यामुळे सदरचे व्हिडीओ पाहुन व ऐकुन समाजातील मुलामुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थीती बिघडविण्यास कारणीभुत होत असल्याने यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९२, २९४, ५०६, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ प्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल आहे.

घटनेचे गार्भीय ओळखुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे ०२) श्री श्री रामचंद्र घाडगे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी सपोनि अभिजीत जाधव यांना गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करणे बाबत आदेशीत केले. सपोनि अभिजीत जाधव, पोलीस अंमलदार पोना अतिक शेख, मपोहवा मपोहवा पोवार व इतर अंमलदार यांनी शिताफिने आरोपीस साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ व साक्षी राकेश कश्यप यांना तात्रीक तपास करून त्यांनी गुन्हयात वारपलेले डीव्हाइस सोबत ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी गुन्हयाचे गांभीर्य माहीत नसल्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. सदर बाबत त्यांनी पच्छाताप व्यक्त करून माफी मागीतली आहे. सदर बाबत पोलीस निरीक्षक गुन्हे ०२, श्री रामचंद्र घाडगे हे अधिक तपास करीत असून आरोपी महीला नामे १) साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ वय १८ वर्षे १ महीना (जन्म दि.०१/०१/२००४) रा. मातोश्री बिल्डींग, तीसरा मजला, पवार नगर – ३. थेरगाव पुणे, २) साक्षी राकेश कश्यप वय १८ वर्षे (जन्म दि.२१/०९/२००३) रा. पत्राशेड लिंकरोड, जलशुध्दीकरण जवळ, पत्राचाळ, पिंपरी पुणे यांना दि.३०/०१/२०२२ रोजी गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास चालु आहे.

सदरची कारवाई मा. श्री कृष्णप्रकाश सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड मा. डॉ संजय शिंदे सो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मा. श्री आनंद भोईटे सो, पोलीस उप आयुक्त, परि २ पिंपरी चिंचवड मा. श्री श्रीकांत दिसले, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, श्री. संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक, गुन्हे-०२, सपोनि श्री. अभिजीत जाधव, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश तोरगल पोलीस अंमलदार दिपक भोसले, कल्पेश पाटील, अतीक शेख, विनायक म्हसकर यांनी मिळुन केली आहे.

Leave a Reply