Headlines

तो मला ‘डर्टी मेसेज’….; मेस्सीबद्दल Miss Bumbum चा गौप्यस्फोट

[ad_1]

मुंबई : खेळजगताला हादरवणारी बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली. ही बातमी होती, जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू गेरार्ड पीके आणि त्याची पार्टनर, पॉप गायिका शकिरा यांच्या ब्रेकअपची. शकिरासारखी जोडीदार असतानाही या नात्यात दुरावा आलाच कसा, असाच प्रश्न काहींनी उपस्थित केला. (Spain footballer Gerard Pique wife and singer Shakira)

सूत्रांच्या माहितीनुसार गेरार्डला आपली फसवणूक करताना शकिरानं प्रत्यक्ष पाहिलं आणि इथंच या नात्यात ठिणगी पडली. आता गेरार्डसंबंधीचा आणखी एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे. यानिमित्तानं लिओनेल मेस्सी या बार्सिलोनाच्या स्टार फुटबॉलपटूचं नावही समोर आलं आहे. 

ब्राझिलीयन मॉडेल Susy Cortez हिनं गा गौप्यस्फोट करत मेस्सी आणि Phillipe Coutinho हे खेळाडू सोडले तर, इतर सर्वजण आपल्याला अश्लील मेसेज ‘dirty’ text करतात असं सांगितलं. 

35 वर्षीय पीकेनंही आपल्याला इन्स्टाग्राम मेसेंजरच्या माध्यमातून असेच मेसेज केल्याचं कोर्टेजनं सांगितलं. 

Miss Bum Bum म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोर्टेजनं पीकेविषयी माध्यमांशी संवाद साधताना शकिराबाबत सहानुभूतीसुद्धा दाखवली. मला थेट मेसेज पाठवणाऱ्यांपैकी तो एक होता असं तिनं स्पष्ट केलं. 

मला कोणी ‘असे’ मेसेज पाठवले नसतील तर ते म्हणजे मेस्सी आणि Coutinho, असं म्हणत या मॉडेलनं सर्वांच्या नजरा वळवल्या. शिवाय हे खेळाडू उत्तम फुटबॉलपटू असण्यासोबतच तितकेच चांगले पती असल्याचं म्हणत तिनं त्यांचं कौतुकही केलं. 

कोर्टेज आणि पीके यांची ओळख बार्सिलोनाच्या माजी संचालकांच्या माध्यमातून झाली होती. तेव्हाच पीकेनं तिच्याकडे फोन नंबर मागत तिला मेसेजही केला होता. कोर्टेजच्या या गौप्यस्फोटामुळं आता पीकेच्या या सवयीच त्याच्या आणि शकिराच्या नात्यात वादळ आणण्यास कारणीभूत ठरल्याचं अधिक स्पष्ट होत आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *