Headlines

Snehal Shidam romantic photo : अहं अहम्! चाललंय काय? स्नेहल शिदम -निखिल बनेचा रोमँटिक फोटो Viral

[ad_1]

Snehal shidam romantic photo viral : चला हवा येऊ द्या (chala hava yeu dya) आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा (maharashtrachi hasyjatra) या दोन्ही कार्यक्रमांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं आहे, महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. या दोन्ही शो मधील सर्व कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हे सर्व कलाकार प्रेक्षकांना आपल्या घरातील कुटुंबातील हिस्साच असल्यासारखे वाटतात.  (Snehal shidam romantic photo viral ) 
सध्या या दोन्ही कार्यक्रमातील कलाकारांपैकी दोन कलाकार फारच चर्चेत आहेत. चला हवा येउद्या फेम स्नेहल शिदम (snehal shidam) आणि हास्यजत्रा फेम निखिल बने (nikhil bane) या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालत आहे. याच फोटोमुळे दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याचं बोललं जात आहे. 

व्हॅलेंटाईन वीकमध्ये (valentine day 2023) हा फोटो व्हायरल (viral) होत आहे. त्यामुळे दोघेजण प्रेमात पडलेत कि काय असा अंदाज आता प्रेक्षकांना लावत आहेत.  केशरी रंगाच्या साडीत अगदी

पारंपरिक वेशभूषेत असणाऱ्या स्नेहलने अंबाडा घालून सुंदर असा मेकअप केला आहे. ज्यात ती फार सुंदर दिसत आहे. मुख्य म्हणजे हा फोटो साधासुधा नाहीये. स्नेहलने या फोटोमध्ये आपला हात

निखिलच्या हातात पकडला आहे आणि ती यात लाजताना दिसत आहे. शिवाय निखिलच्या खांद्यावर डोकं ठेवत हा फोटो काढला आहे. या फोटोला कॅप्शन दिल आहे, ”पिरतीच्या फडात गं, धरला हात असा, काळीज एंधल आरलं”

आता इतका रोमँटिक कॅप्शन आणि गोड फोटो पाहिल्यावर दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुटतोय की काय असं नेटकऱ्यांना वाटू लागलं आहे.  

हा फोटो वनिता खरातच्या लग्नातला असल्याचं बोललं जात आहे. त्यात स्नेहलने हॅशटॅग दिला आहे. #bestfriendswedding आणि त्यातही #wearejustfriend असंही कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे स्नेहलला नेमकं काय सांगायचं आहे हेच कळतं नाहीये. 

स्नेहलने हा फोटो टाकला म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना…स्नेहलच्या या रोमँटिक फोटोवर श्रेया बुगडे (shreya bugade) ने कंमेंट केली आहे की, मला तू काहीच सांगितलं नाहीयेस,लवकर मेकअप रूममध्ये ये ” तर , हेमांगी कवी ने ” बरं बरं.. ” असं म्हटलं आहे, हृषीकेश जोशीने ” हवा येउद्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा यांची युती झाली ” अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

एकूणच काय, स्नेहल आणि निखिलच्या या फोटोच नेमकं सत्य काय ? हे लवकरच सर्वांसमोर येईल हे नक्की. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *