Headlines

स्मार्टफोनवरून अगदी मिनिटात बदलू शकता आधार कार्डवरील माहिती, जन्मतारीख-नाव-पत्त्यात करता येईल बदल; जाणून घ्या प्रोसेस

[ad_1]

नवी दिल्ली : प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. केवळ ओळखपत्र म्हणूनच नाही तर अनेक महत्त्वाच्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधार कार्डचा उपयोग होतो. अगदी शाळेपासून ते बँकेत खाते उघडण्यासाठी, सिम कार्ड घेण्यासाठी, सबसीडीचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचे कागदपत्रं आहे. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती अचूक असणे गरजेचे आहे. आधार कार्डवर नाव, पत्ता, वय, जन्मतारीख इत्यादी माहिती उपलब्ध असते. यापैकी एकही माहिती चुकीची असल्या मोठी समस्या निर्माण होऊ शकते. मात्र, तुम्ही घरबसल्या तुमच्या आधार कार्डवरील माहितीत बदल करू शकता. स्मार्टफोनच्या माध्यमातून देखील माहिती बदल करणे शक्य आहे. याबाबतची प्रोसेस जाणून घेऊया.

आधार कार्डमधील नाव, पत्ता आणि जन्मतारखेत असा करा बदल

  • जर तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि जन्मतारखेत चूक झाली असल्यास तुम्ही स्वत यात बदल करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जावे लागेल.
  • वेबसाइटवर तुम्हाला माय आधार पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर अपडेट योर आधार’ पर्यायावर क्लिक करा. आता ‘Update your Demographics Data Online’ वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाइट ssup.uidai.gov.in वर रिडायरेक्ट व्हाल.
  • आता येथे तुम्हाला १२ आकडी नंबर टाकावा लागेल. हा नंबर टाकून लॉग इन करा व कॅप्चा कोड भरा. यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करा.
  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन येईल. येथे तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि जेंडर इत्यादी महत्त्वाची माहिती भरायची आहे. आता तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे अथवा बदलायची आहे, त्यावर क्लिक करा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर बदलेली माहिती अपडेट होईल. मात्र, ज्या माहितीत तुम्हाला बदल करायचा आहे, त्याचा पुरावा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुम्हाला जन्मतारखेत बदल करायचा अशल्यास आयडी प्रुफ पुरावा म्हणून द्यावा लागेल.

वाचा: Realme ते Samsung ‘या’ भन्नाट स्मार्टफोन्सची किंमत १०,००० पेक्षा कमी, गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, पाहा लिस्ट

वाचा: ऐन उन्हाळ्यात वाढत्या Electricity बिलाने झोप उडविली ? करा हे ३ काम, बिलात होणार ५० % पर्यंत बचत

वाचा: या भन्नाट पॉवर बँकच्या मदतीने ३ वेळा फोन करा फुल चार्ज, डिव्हाइसमध्ये फ्लॅश लाईट , किंमत खूपच कमी

वाचा: फोन हरविल्यास किंवा चोरी गेल्यास घाबरुन न जाता फॉलो करा ‘ही’ सोप्पी ट्रिक, सहज करता येईल फोन ट्रॅक

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *