Headlines

स्मार्टफोनमधून डिलीट झाले तुमचे महत्त्वाचे फोटो? ‘या’ सोप्या स्टेप्सने करा रिकव्हर

[ad_1]

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामे एकप्रकारे लवकर होण्यास मदत झाली आहे. मात्र, केवळ कॉलिंग आणि चॅटिंगसाठीच फोनचा वापर होत नाही तर जुन्या आठवणी असलेले फोटो आणि व्हिडिओ देखील स्टोर करण्यासाठी आपण हँडसेट्सचा वापर करतो. आपल्या फोनमध्ये स्वतःचे, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक असे अनेकांचे असंख्य फोटो स्टोर केलेले असतात. मात्र, हे महत्त्वाचे फोटो अचानक डिलीट झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. अनेकदा नकळत हे फोटो डिलीट होतात. मात्र, तुमच्या फोनमधील फोटो देखील डिलीट झाले असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशीच एक सोपी प्रोसेस सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहज फोटो रिकव्हर करू शकता. ही प्रोसेस काय आहे, ते जाणून घेऊया.

डिलीट झालेल्या फोटोला असे करा रिकव्हर

  • तुमच्या डिलीट झालेल्या फोटोला रिस्टोर करण्यासाठी सर्वात प्रथम फोनमध्ये गुगल फोटो अ‍ॅपला ओपन करा.
  • अ‍ॅपला ओपन केल्यानंतर लायब्रेरीचा पर्याय निवडा.
  • आता ट्रॅशचा पर्याय निवडा.
  • गुगल फोटो ट्रॅशमध्ये तुम्हाला चुकीने डिलीट झालेले सर्व फोटो दिसतील.
  • आता तुम्ही या फोटोंना सिलेक्ट करून रिस्टोर करू शकता.
  • जर तुम्हाला गुगल फोटो अ‍ॅपमध्ये देखील डिलीट झालेले फोटो मिळाले नसल्यास, अशा स्थितीत फोनमध्ये डेटा रिकव्हरी टूलला डाउनलोड करावे लागेल.
  • डेटा रिकव्हरी टूलच्या मदतीने तुम्ही सहज डिलीट झालेले फोटो रिकव्हर करू शकता.

दरम्यान, डेटा रिकव्हरी टूलला डाउनलोड करण्यापूर्वी त्याच्या विश्वासार्ह्यता नक्की तपासा. त्यानंतरच या टूलला फोनमध्ये इंस्टॉल करा. अशाप्रकारे तुम्ही सहज डिलीट झालेले फोटो व व्हिडिओ डाउनलोड करू शकतात. काही फोनमध्ये डिलीट झालेले फोटो recycle bin देखील स्टोर होतात. तुम्ही येथून देखील फोटो रिकव्हर करू शकता.

वाचा: Flipkart Cooling Days सेलमध्ये कूलर-पंख्यावर बंपर डिस्काउंट, किंमत फक्त ९९९ रुपयांपासून सुरू; पाहा डिटेल्स

वाचा: १० हजारांच्या बजेटमध्ये गुपचूप लाँच झाला Realme चा ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

वाचा: रियलमीसह ‘या’ टॉप स्मार्टफोन्सवर मिळवा जबरदस्त डील्स, स्वस्तात घरी येणार नवा स्मार्टफोन

वाचा: एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभराचे टेन्शन विसरा, पाहा ‘हे’ स्वस्त वार्षिक प्लान्स, दिवसाचा खर्च ८ रुपयांपर्यंत

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *