स्मार्टफोनच्या स्पीकरचा व्हॉल्युम कमी झालाय? मिनिटांत करा फिक्स, पाहा ‘या’ भन्नाट ट्रिक्स


नवी दिल्ली: जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन खूप दिवसांपासून वापरत असाल आणि जर तो खूप जुना झाला असेल तर, कधी- कधी त्याचे Functioning नीट होत नाही. ज्याप्रमाणे अनेकांना फोन स्लो झाल्याची तक्रार असते. त्याचप्रमाणे स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये आवाज नीट येत नसल्याची तक्रार देखील अनेक जण करतात. अशात, स्मार्टफोनचा आवाज कमी असेल तर अनेकदा महत्वाच्या कॉलवर समोरील व्यक्ती काय बोलत आहे हे कळात नसल्यमुळे अडचणींना सामोरं जावं लागू शकते. कधी-कधी हे कॉल्स ऑफिसचे असतील तर समस्या अधिकच गंभीर बनू शकते. फोन दुरुस्त करण्यासाठी द्यायचा असेल तर त्याचा खर्च देखील तितकाच येतो. तुम्हीही याच समस्येला सामोरं जात असाल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. काही सोप्प्या टिप्स यात तुमची मदत करू शकतात. भन्नाट टिप्स वापरून तुम्ही स्मार्टफोन स्पीकरचा आवाज वाढवून हा खर्च वाचवू शकता.

वाचा: आता प्रत्येक घरात AC, ‘या’ कंपनीने लाँच केले बजेट एसी मॉडेल्स , AC मध्ये अनेक स्मार्ट फीचर्स, पाहा किंमत

जाणून घ्या या टिप्स. व्हॉल्यूम बूस्टर अॅप्स: यासाठी तुम्हाला व्हॉल्यूम बूस्टर अॅप्सचा वापर करावा लागेल. व्हॉल्यूम बूस्टर अॅप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या आवाजाची समस्या मार्गी लावू शकता. व्हॉल्यूम बूस्टर अॅप्स तुमच्या स्मार्टफोनचा व्हॉल्यूम वाढवू शकतात आणि यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. सहज सोप्य्या वापरामुळे व्हॉल्यूम बूस्टर अॅप्स खूप लोकप्रिय होत आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढवू शकता.

व्हॉल्यूम बूस्टर अॅप्स कसे वापरायचे ?

जर तुम्हालाही तुमच्या स्मार्टफोनच्या Low Volume मुळे त्रास होत असेल आणि तो वाढवायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला Google प्ले स्टोअरवर जाऊन तेथे व्हॉल्यूम बूस्टर अॅप्स शोधावे लागतील. व्हॉल्यूम बूस्टर अॅप्स सर्च केल्यानंतर तुम्हाला रेटिंगनुसार व्हॉल्यूम बूस्टर डाउनलोड करावे लागेल. हे व्हॉल्यूम बूस्टर अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला त्याची सेटिंग पूर्ण सेट करावी लागेल. सेटिंग पूर्ण झाल्यांनतर तुम्ही ते वापरू शकता आणि आता तुम्ही गरजेनुसार आवाज वाढवून तुमच्या आवडीचे संगीत ऐकू शकता. व्हॉल्यूम बूस्टर अॅप्सच्या मदतीने तुम्हाला कॉलिंग दरम्यान देखील कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

वाचा: लॅपटॉपवर काम करतांना चुकूनही ‘या’ वस्तू ठेवू नका जवळ, ठेवल्यास लॅपटॉप होऊ शकतो कायमचा खराब, पाहा डिटेल्स

वाचा: पार्टी होणार धमाकेदार ! ५० % डिस्काउंटसह घरी आणा ‘हे’ Soundbar, सुरुवातीची किंमत १,२९९ रुपये

वाचा: Apple ते Realme स्वस्तात खरेदी करा ‘हे’ स्मार्टफोन्स, पाहा ‘या’ खास डील्स

Source link

Leave a Reply