स्मार्टफोन विकतांना जरा सांभाळूनच ! खरेदी करणारा सहज मिळवू शकतो तुमचे Deleted Photos, पाहा डिटेल्स


नवी दिल्ली: आजकाल बाजार नव-नवीन स्मार्टफोन्सनी भरलेला आहे. कंपन्या त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. अशात अनेक स्मार्टफोन युजर्स देखील नवीन स्मार्टफोन लाँच होण्याची वाट पाहत असतात. नवीन फोनमध्ये काहीतरी भन्नाट मिळेल असेही त्यांना वाटत असते. बाजारातील हे अपडेटेड स्मार्टफोन्स पाहून अनेकांना त्यांचा फोन जुना वाटायला लागतो आणि मोठ्या संख्येने युजर्स एक ते दीड वर्षानंतरच फोन बदलण्याचा प्रयत्न करतात. असे करत असतांना बरेच लोक त्यांचा जुना फोन विकतात आणि त्याच पैशातून नवीन स्मार्टफोन विकत घेतात. पण, अनेकदा युजर्स त्यांचा स्मार्टफोन विकतांना योग्य ती काळजी घेत नाही. ज्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात. तुम्ही देखील तुमचा स्मार्टफोन विकण्याचा विचार करीत असाल तर त्याआधी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

वाचा: International Womens Day 2022: हे ट्रेंडी गॅझेट्स ठरतील बेस्ट गिफ्ट, लगेच खरेदी करा, पाहा लिस्ट

जुना फोन विकताना अनेकदा लोक फोनचे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतात. त्यांना असे वाटते की आता त्यांचा डेटा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला अॅक्सेस करता येणार नाही. पण, असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. फक्त डिलीट बटण दाबल्याने, फोटोज गॅलरीतून Delete होतात. पण, नंतर दुसऱ्या ठिकाणी संग्रहित होतात आणि कोणीही त्यांना पुन्हा मिळवू शकतो. Deleted Photos फोटो रिस्टोर करता येतात: हे करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. पहिला मार्ग म्हणजे तुमचे फोटो Recently Deleted फोल्डरमधून मिळवता येतात. त्या व्यक्तीने तिथूनही फोटोज काढले असतील तरीही फोटोज Access करता येतात.

दुसरी पद्धत : बाजारात अनेक रिकव्हरी सॉफ्टवेअर्स देखील उपलब्ध आहेत. ज्याद्वारे फोनमधून हटवलेले फोटो रिस्टोअर करता येतात. अशी घ्या काळजी: सर्वप्रथम, तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप तयार करा आणि तो तुमच्याकडे सेव्ह करा. फोनवरील सर्व अॅप्समधून लॉगआउट करा. स्मार्टफोनमधून तुमचे सिम कार्ड आणि मायक्रोएसडी कार्ड काढा. फक्त फोटोज डिलीट करणे पुरेसे नाही. तुमचा फोन फॅक्टरी रीसेट करा. फोनच्या सेटिंग्जमध्ये जा, रीसेट पर्याय शोधा. त्यानंतर फॅक्टरी रीसेटवर जा आणि फोन पूर्णपणे रीसेट करा. असे केल्याने फोनवरील सर्व डेटा क्लियर होईल.

वाचा: Holi 2022: तुमच्या महागड्या स्मार्टफोनला रंग आणि पाण्यापासून ‘असे’ ठेवा सेफ, फॉलो करा या कूल टिप्स

वाचा: फ्लिपकार्ट आणि Amazon ला आव्हान द्यायला आल्या ‘या’ शॉपिंग वेबसाईट्स, अर्ध्याहून कमी किमतीत विकतात प्रोडक्टस

वाचा: एकच नंबर! ‘या’ स्पीकरला करू शकता उन्हात चार्ज, किंमत खूपच कमी, फीचर्सही मस्त

Source link

Leave a Reply