Headlines

स्मार्टफोनवरुन सहज बदलू शकता Aadhaar वरील चुकीची जन्मतारीख, मिनिटात पूर्ण होईल काम

[ad_1]

नवी दिल्ली :आधार कार्ड (Aadhaar Card) आज महत्त्वाचे कागदपत्रं झाले आहे. याचा उपयोग केवळ ओळखपत्र म्हणून नाही तर सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी, करोनाची लस घेण्यासाठी यासह अनेक कामासाठी होतो. त्यामुळे आधार कार्डमधील माहिती चुकीची असल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती चुकीची असल्यास त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे, अन्यथा ऐनवेळी समस्या निर्माण होते. आधार कार्डवर आपले नाव, जन्मतारीख, फोटो व पत्ता इत्यादी माहिती असते. ही सर्व माहिती बरोबर असणे गरजेचे आहे. जर तुमच्या आधारवरील जन्म तारीख चुकीची असल्यास तुम्ही सहज दुरुस्त करू शकता. UIDAI ने यासाठी सोपी प्रोसेस उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही घरबसल्या ही चूक दुरुस्त करू शकता. याविषयीची प्रोसेस जाणून घेऊया.

वाचा: अशी संधी पुन्हा नाही! २ हजारांच्या बजेटमध्ये मिळतील जबरदस्त ५जी स्मार्टफोन्स, फीचर्स एकदा पाहाच

Aadhaar Card वरील जन्मतारखेत असा करा बदल

  • ऑनलाइन जन्म तारखेत बदल करण्यासाठी https://ssup.uidai.gov.in/ssup/ या लिंकवर क्लिक करा.
  • आता तुमचा १२ आकडी आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड व्हेरिफाय करा.
  • पुढे सेंड ओटीपी ऑप्शनवर क्लिक करा. हा कोड तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.
  • तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवलेल्या ओटीपीला व्हेरिफाय करून लॉग इन करा.
  • आता Date of birth चा पर्याय निवडा.
  • त्यानंतर पुरावा म्हणून मूळ कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करा.
  • तुम्हाला जर जन्मतारीख बदलण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे, हे माहित नसल्यास https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf या लिंकवर क्लिक करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.
  • कागदपत्रं अपलोड केल्यानंतर सबमिट करा.
  • या प्रक्रियेनंतर आधारवरील जन्मतारखेत बदल होईल. यानंतर तुम्ही अपडेटेड आधार कार्डची ऑनलाइन प्रिंट देखील काढू शकता.

दरम्यान, लक्षात ठेवा की आधार कार्डवरील माहितीत बदल करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी या नंबरवर येईल. जन्मतारखेसोबतच तुम्ही आधारवरील इतर चुकीची माहिती देखील ऑनलाइन मिनिटात बदलू शकता. यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज नाही.

वाचा: ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे तब्बल २,४०० रुपये कॅशबॅक, करावे लागेल ‘हे’ काम; पाहा डिटेल्स

वाचा: फक्त एका मिस कॉलने इतरांना पाठवता येतील पैसे, इंटरनेटचीही गरज नाही; जाणून घ्या प्रोसेस

वाचा: मस्तच ! होळीच्या आधी ‘या’ कंपनीने केली स्मार्टवॉचेसच्या किमतीत कपात, लगेच ऑफर्स पाहा

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *