Headlines

Smartphone Tips: फोनमध्ये नेटवर्क येत नाही? सेटिंगमध्ये त्वरित करा ‘हा’ बदल, मिनिटात दूर होईल समस्या

[ad_1]

नवी दिल्ली :Wi-Fi Calling Feature: मोबाइल नेटवर्कशी संबंधित समस्या अनेकदा येत असते. तुम्ही शहरात राहणारे असा अथवा गावाकडे, नेटवर्कशी संबंधित समस्या प्रत्येक मोबाइल यूजर्सला येते. अनेकदा महत्त्वाचा कॉल करायचा असतो, अशा वेळी फोनमध्ये नेटवर्कच नसते. मात्र, तुमच्या स्मार्टफोनमध्ये एक असे फीचर आहे, जे ही समस्या दूर करते. हे फीचर केवळ स्मार्टफोनमध्येच उपलब्ध आहे. फीचर फोन यूजर्सला याचा फायदा मिळणार नाही. तुम्ही जर सतत वाय-फाय वापरत असाल तर नेटवर्कची समस्या अगदी मिनिटात दूर होईल. याद्वारे तुम्ही सहज कोणालाही कॉल करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.

Wi-Fi Calling फीचर

अँड्राइड स्मार्टफोन आणि iPhone मध्ये Wi-Fi Calling फीचर मिळते. या फीचरच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनमध्ये येणारी नेटवर्कची समस्या दूर करू शकता. यासाठी तुमच्या घरामध्ये वाय-फाय कनेक्शन असणे गरजेचे आहे. तुम्ही जर आयफोन यूजर असाल, तर सर्वात प्रथम फोनच्या सेटिंगमध्ये जा. येथे तुम्हाला Mobile Data सेक्शनवर क्लिक करायचे आहे. आता Wi-Fi Calling हा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. मात्र लक्षात ठेवा की, तुमचा फोन Wi-Fi Calling सपोर्ट करत असल्यावर हा पर्याय तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला Wi-Fi Calling on This iPhone इनेबल करायचे आहे. अशाप्रकारे, तुम्ही वाय-फाय कॉलिंग सुविधेचा वापर करू शकता.

अँड्राइड यूजर्स असे इनेबल करू शकतात फीचर

Wi-Fi Calling फीचर सुरू करण्यासाठी अँड्राइड यूजरला स्मार्टफोनच्या सेटिंग्समध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला Network & Internet चा पर्याय दिसेल. आता तुमच्यासमोर Wi-Fi Preferences चा पर्याय असेल, यावर टॅप करून Advanced पर्यायावर जा. आता तुम्हाला Wi-Fi Calling चा पर्याय इनेबल करावा लागेल. मात्र, लक्षात ठेवा की प्रत्येक फोनमध्ये वाय-फाय एनेबल करण्याचा पर्याय वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन Wi-Fi Calling फीचरला सर्च देखील करू शकता.

या फीचरचा फायदा काय?

या फीचरच्या मदतीने नेटवर्क खराब असतानाही चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. ही सेटिंग ऑन केल्यानंतर तुम्ही सामान्य फोन कॉलप्रमाणेच वाय-फाय कॉलिंगचा फायदा घेऊ शकता. तुम्ही वाय-फायशी कनेक्टेड नसल्यास, तुमचा फोन सामान्य नेटवर्कचा वापर करेल.

वाचा: POCO Smartphone: पहिल्याच सेलमध्ये फक्त १,४४९ रुपयात खरेदी करता येईल POCO M4 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

वाचा: Prepaid Plans: जिओने लाँच केले एकापेक्षा एक भन्नाट प्लान्स, मोफत Disney+ Hotstar सह मिळेल बरचं काही

वाचा: Recharge plans: Jio चा धमाकेदार प्लान! १ वर्षासाठी Disney+Hotstar फ्री, डेटा-कॉलिंगचाही फायदा; पाहा डिटेल्स

वाचा: Amazon Sale: भारीच! १०८MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या Samsung च्या फोनवर बंपर डिस्काउंट, खूपच स्वस्तात खरेदीची संधी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *