Headlines

स्मार्टफोन चोरी झाल्यास लगेच करा हे काम, कुणीही फोनचा गैरवापर करुच शकणार नाही

[ad_1]

नवी दिल्ली: How To Block Smartphone: स्मार्टफोन थोडा वेळ जरी नजरेआड झाला तर युजर्सना टेन्शन येते. अशात जर फोन चोरी गेला किंवा हरविला तर काय होणार आणि किती टेन्शन येणार याची कल्पना करणे कठीणच. यामागील कारण देखील तसेच आहे. आजकाल स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. केवळ मनोरंजनच नाही तर आता बँकिंगपासून ते फोनपर्यंत सर्व वैयक्तिक कामे फोनवरच व्ह्ययला लागली आहे. अशा परिस्थितीत फोन चोरीला गेल्यानंतर त्याचा गैरवापर होण्याचा धोका असतो. तुम्हाला कोणीही ब्लॅकमेल करू शकतो. सायबर फ्रॉडसारख्या घटनाही घडू शकतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमचा फोन ऑनलाइन ब्लॉक करू शकता.

वाचा: Google Search रिझल्टमध्ये तुमची वैयक्तिक माहिती दिसतेय ? ‘असे’ करा डिटेल्स रिमूव्ह ,पाहा टिप्स

फोन ब्लॉक केल्यानंतर कोणीही तुमचा फोन वापरू शकणार नाही. चांगली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला तुमचा फोन काही दिवसांनी परत मिळाला तर तुम्ही पुन्हा अनब्लॉक करू शकता. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR), दूरसंचार विभागाची वेबसाइट चोरी गेलेले स्मार्टफोन ब्लॉक आणि अनब्लॉक करू शकते. याच्या मदतीने तुम्हाला फोनचे लोकेशन देखील कळते.

वाचा: मस्तच ! Samsung Galaxy A Series च्या स्मार्टफोन्सची किंमत झाली कमी, ऑफर्स आणि फीचर्स पाहा

फोन कसा ब्लॉक करायचा?

सर्वप्रथम तुम्हाला CEIR वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील ब्लॉक/हरवलेला मोबाईल, रिक्वेस्ट स्टेटस तपासा आणि अनब्लॉक फाउंड मोबाईल. चोरी गेलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी Block/Lost Mobile या पर्यायावर क्लिक करा. एक पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल डिटेल्स टाकावे लागतील. येथे तुम्हाला मोबाईल नंबर, IMEI नंबर, डिव्‍हाइस ब्रँड, कंपनी, फोन खरेदी इन्व्हॉइस, फोन हरवण्‍याची तारीख टाकावी लागेल. याशिवाय,तुमचा फोन कुठे चोरी गेला आहे त्याची संपूर्ण माहिती आणि एफआयआर क्रमांक रेकॉर्ड करावा लागेल. एफआयआरची प्रत अपलोड करावी लागेल. सर्व तपशील भरल्यानंतर ते अपलोड करावे लागेल.

त्यानंतर Add more तक्रार वर क्लिक करा. येथे मोबाईल मालकाचे नाव, पत्ता आणि आधार कार्डसह पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि ओळख प्रविष्ट करावी लागेल. शेवटी तुम्हाला पुन्हा मोबाईल नंबर विचारला जाईल. तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. त्याद्वारे पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सबमिशन करून मोबाईल फोन ब्लॉक केला जाऊ शकतो.

पोलीस एफआयआर आवश्यक आहे

तुमचा फोन हरविल्यास, तुम्हाला सर्वप्रथम त्याची तक्रार करणे आवश्यक आहे. तुम्ही त्याची ऑनलाइन नोंदणीही करू शकता. एफआयआर क्रमांक तयार केला जाईल. एकदा एफआयआर नोंदवल्यानंतर फोनवर केलेल्या कोणत्याही चुकीच्या कृत्यासाठी तुम्ही कायदेशीररित्या जबाबदार राहणार नाही.

वाचा: Flipkart Big Billion Days सेलमध्ये २०,००० रुपयांच्या बजेटमध्ये मिळताहेत ‘हे’ पॉवरफुल स्मार्टफोन, पाहा ऑफर्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *