Smartphone Safety: स्मार्टफोनमधील महत्वाचा डेटा ट्रॅक होण्यापासून असा वाचवा ‘हे’ टूल्स करतील मदत, माहिती राहील सेफ


नवी दिल्ली: Data Safety Tips: आजच्या या हायटेक युगात इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे हॅकिंगचे प्रमाण देखील वाढले आहे. कधी- कधी युजरच्या नकळत त्यांचा डेटा ट्रॅक केला जातो. मोबाईल अॅप्स आणि वेबसाइट्स तुमचा डेटा कसा वापरतात याबद्दल तुम्हाला काळजी वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील काही Privacy and Protection features च्या मदतीने ही भीती कमी करू शकता. तुमच्या फोनमध्ये असलेले अनेक फीचर्स तुमची यात मदत करू शकतात. जसे की, गाडी चालवताना फोनची Location सर्व्हिस खूप महत्त्वाची असते. परंतु, तुम्हाला माहितेय का? iOS आणि Android युजर्सना अधिक गोपनीयता पाहण्याची परमिशन देतात. ज्यामुळे तुम्ही फक्त तुम्हाला हवे तेच लोकेशन शेयर करू शकता.

वाचा: Prepaid Plans: ‘या’ कंपनीच्या नवीन प्लानमध्ये फक्त ८७ रुपयांत मिळणार रोज १ GB डेटा, फ्री कॉल्ससह Hardy Games चे सब्सक्रिप्शन

अॅप्स आणि जाहिराती :

iOS 15 मधील अॅपलचे अॅप ट्रॅकिंग Transparency Feature जेव्हा अॅप तुमच्या Online Activity वर नजर ठेवते तेव्हा माहिती देते. याव्यतिरिक्त, अॅप जाहिराती बंद केल्या जाऊ शकतात. तुम्ही सध्या वापरत नसलेली अॅप्स वगळता, Android त्या अॅप्ससाठी आपोआप पर्मिशन्स बंद करते. सेटिंग्जमधील प्रायव्हसी पर्यायांतर्गत ते ऍक्सेस करता येते.

वेब:

सफारीचे पर्सनल ब्राउझिंग आणि Google Chrome चा गोपनीयता मोड तुमचे सर्फिंग सेशन सेव्ह करत नाहीत. परंतु, ब्राउझर ट्रॅकर्सवर ते इतके प्रभावी नाही. Apple चे Safari ब्राउझर या प्रकारचे ट्रॅकिंग ब्लॉकिंग टूल ऑफर करते. जे Safari-गोपनीयता आणि सुरक्षा अंतर्गत सेटिंग्जमध्ये आढळू शकते.

Gmail:

जाहिरातदार काही मेसेजसज मध्ये ट्रॅकिंग पिक्सेल वापरतात. हे एक छोटेसे चित्र आहे जे लपलेले आहे. जेव्हा युजर इमेज उघडतो, तेव्हा फोटो पाठवणाऱ्याला माहित होते . iOS 15 मध्ये मेल ट्रॅकर्स ब्लॉक करण्यासाठी एक Tool आहे. जे सेटिंग्जमधील मेल विभागात जाऊन सुरु केले जाऊ शकते. तुम्ही Android किंवा iOS वर Gmail अॅपमध्ये फोटो आपोआप लोड होण्यापासून थांबवू शकता.

वाचा: Portable Fans: कडक उन्हातही राहा Cool, फक्त २०० रुपयांत घरी आणा हे कुलिंग डिव्हाइस, एका चार्जवर चालणार १३ तास

वाचा: Smartwatch Launch: धुमाकूळ घालायला लाँच झाली inbase ची ‘ही’ स्मार्टवॉच, फुल चार्जवर ६० दिवस चालणार, किंमतही बजेटमध्ये

वाचा: Cashback Tips: ऑनलाईन खरेदी करताना ‘या’ खास वेबसाईट्सची घ्या मदत, मिळणार मोठा कॅशबॅक, होणार सेव्हिंग

Source link

Leave a Reply