छोटा पॅक बडा धमाका! अवघ्या इतक्या दिवसात पूर्ण झाले बॉलिवूडचे ‘हे’ Hit चित्रपट


Bollywood films that made in few time: बॉलीवूडमध्ये सर्वात बिग बजेट सिनेमे बनतात. सेटपासून ते कॉश्च्यूम्सपर्यंत सगळ्याचीच मोठी तयारी प्रत्येक फिल्मसाठी बॉलीवूडमध्ये घेतली जाते. तेव्हा नक्कीच या सगळ्या तामझामामुळे अनेकांना असे वाटते की कदाचित फार दीर्घकाळ बॉलीवूडच्या सिनेमांचे शूटिंग होत असेल परंतु बॉलीवूडमध्ये असेही काही सिनेमे आहेत ज्याचे शूटिंग फार कमी कालावधीत संपन्न झाले होते. 

कोणताही चित्रपट बनवण्यासाठी त्याच्या कथेसोबतच त्या चित्रपटाच्या देखाव्यापर्यंत सगळ्यावर मेहनत घ्यावी लागते. नुकताच रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट रिलिज झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट तयार होयला जवळपास 6 वर्षे लागली. परंतु असेही काही चित्रपट आहेत ज्यांना बनवायला फारच कमी वेळ लागला. एक चित्रपट असाही आहे ज्याला बनायला फक्त 10 दिवस लागले. समोर आलेल्या माहितीनूसार खालील चित्रपटांच्या शूटिंगसाठी फारच कमी कालावधी लागला होता. 

हाऊसफुल्ल 3 – (Housefull 3)
हा चित्रपट बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा सर्वात हिट ठरलेला चित्रपट आहे. अक्षयसोबत या चित्रपटात अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि यांच्यासह अनेक मोठे दिग्गज कलाकारही होते. मल्टिस्टारर असा चित्रपट बनवण्यासाठी या चित्रपटाची शूटिंग केवळ 38 दिवस सुरू होती. 

जॉली एलएलबी 2 – (Jolly LLB 2) 
अक्षय कुमारचा दुसरा हिट आणि लोकप्रिय ठरलेला चित्रपट म्हणजे जॉली एलएलबी 2. 2017 साली आलेल्या या चित्रपटासाठी केवळ महिनाभर लागला होता.

तनू वेड्स मनू रिटर्न्स – (Tanu Weds Manu Returns) 
आर. माधवन हे नाव सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीत चर्चेत आहे. हा कंगना राणावतचा हिट चित्रपट होता. समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट बनायलाही महिनाभर लागला होता. 

हरामखोर – (Haramkhor) 
शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या प्रेमकथेवर आधारित नवाजुद्दीन सिद्दीकीचा हा सिनेमा 2015 साली प्रदर्शित झाला होता. हरामखोर हा चित्रपट तयार होण्यासाठी फक्त 16 दिवस लागले होते. 

धमाका – (Dhamaka)
सुपरस्टार कार्तिक आर्यनचा धमाका हा चित्रपट ओटीटीवर रिलिज झाला होता. हा चित्रपट तयार होण्यासाठी केवळ 10 दिवस लागले होते अशी माहिती समोर आली आहे. Source link

Leave a Reply