सर जडेजामुळे ऑलराउंडर टीम इंडियामध्ये संधी मिळेना; करिअर धोक्यात

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटची सूत्र रोहित शर्माच्या हाती आल्यानंतर संघात अनेक बदल झाले. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. रोहित शर्माने अनेक नव्या खेळाडूंनाही संधी दिली. त्याच सोबत जडेजा फुल फॉर्ममध्ये परतल्याचा फायदा टीम इंडियाला झाला. 

रविंद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध एका डावात 175 धावांची खेळी केली. शिवाय कसोटी सीरिजमध्ये त्याने 10 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध टी 20 सीरिजपाठोपाठ कसोटी सीरिजही आपल्या नावावर केली. जडेजा फुलफॉर्ममध्ये खेळताना दिसला. जडेजामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूला परतणं कठीण होणार असल्याचं दिसत आहे. 

या ऑलराउंडरची जागा धोक्यात

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये जडेजानं दमदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील त्याची जागा निश्चित झाली आहे. आता त्याचा फटका दुसऱ्या ऑलराउंडर खेळाडूला बसणार असल्याचं दिसत आहे. 

घातक ऑलराउंडर खेळाडू म्हणून ओळखला जाणार वॉशिंग्टन सुंदरसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचे दरवाजे बंद होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. जडेजामुळे वॉशिंग्टन सुंदरची प्लेइंग इलेव्हनमध्ये परतण्याची वाट बिकट झाली आहे. तो गेल्या काही सामन्यात खेळताना दिसला नाही. जडेजामुळे त्याला संधी मिळत नाही अशी चर्चा रंगली आहे. 

टीम इंडियातून या कारणामुळे बाहेर

वॉशिंग्टन सुंदरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला टी 20 सीरिजमधून बाहेर पडावं लागलं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी त्याला कोरोना झाल्याने तो बाहेर पडला होता. वॉशिंग्टन ऐवजी जयंत यादवला संधी देण्यात आली होती. 

वॉशिंग्टन सुंदरला श्रीलंकेविरुद्ध सीरिजमध्ये संधी देण्यात आली नाही. त्याला बाहेर ठेवण्यात आलं. तर जडेजाला ही संधी मिळाली. सुंदरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपल्या उत्तम फॉर्मने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

विजय हजारे ट्रॉफीत जलवा कायम

सुंदरची विजय हजारे ट्रॉफीतही दमदार कामगिरी पाहायला मिळाली . सेमी फायनलमध्ये त्याने सौराष्ट्रविरुद्ध 61 चेंडूत 8 चौकार ठोकून 70 धावा केल्या. फलंदाजीसोबतच सुंदर त्याच्या किलर बॉलिंगसाठीही ओळखला जातो. त्याच्या बॉलसमोर टिकून राहाणं हे फलंदाजांसाठी एक आव्हान असतं. 

आतापर्यंत सुंदर टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. तो भारताकडून 4 कसोटी सामने, 1 वनडे आणि 30 टी-20 सामने खेळले आहेत. आता सुंदरला इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात तरी संधी मिळणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *