वाचा: Flipkart Sale: फ्लिपकार्टवर सुरू झाला खास सेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ८०% डिस्काउंट; अवघ्या ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू
घरबसल्या मिळेल तुमच्या आधारवर सुरू असलेल्या सिम कार्डची माहिती
- एक आधार कार्डवर तुम्ही १८ सिम कार्ड घेऊ शकता. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायनुसार, एका आधारवर नागरिक १८ सिम कार्ड घेऊ शकतात.
- तुमच्या आधारवर किती सिम कार्ड अॅक्टिव्ह आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे. तसेच, सर्वात प्रथम तुम्हाला यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल.
- येथे तुम्हाला ‘गेट आधार’वर जावून ‘डाउनलोड आधार’ पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता व्ह्यू मोर या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला ‘आधार ऑनलाइन सर्विस’वर जायचे आहे. त्यानंतर ‘Aadhaar Authentication History’ वर क्लिक करता. पुढे Where can a resident chech/ Aadhaar Authentication History वर जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
- आता तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर सेंड ओटीपी’वर क्लिक करा. आता ‘AuthenticationType’वर ऑल निवडून ज्या तारखेची माहिती हवी आहे, ती निवडा. आता तुमच्या मोबाइलवर आलेला ओटीपी भरा. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आधारवर अॅक्टिव्ह असलेल्या सिम कार्डची माहिती मिळेल. तुम्हाला माहित नसलेला मोबाइल नंबर अॅक्टिव्ह असल्यास ट्रायकडे बंद करण्यासाठी तक्रार देखील करू शकता.
- याशिवाय, तुम्ही tafcop.dgtelecom.gov.in वर जावून देखील याबाबत माहिती घेऊ शकता. मात्र, ही सुविधा ठराविक राज्यातच उपलब्ध आहे.
वाचा: Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी
वाचा: Infinix Smartphones: Note 12 लाँच करण्याच्या तयारीत Infinix , पाहा Flipkart वर कधी सुरु होणार सेल