Headlines

Sikandar Shaikh : ‘सिकंदर शेखवरून द्वेषाचं राजकारण करू नका’, अजित पवारांनी सुनावलं

[ad_1]

Ajit Pawar on Sikandar Shaikh : महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनलमध्ये सिंकदर शेख (Sikandar Shaikh)आणि महेंद्र गायकवाडच्या अंतिम लढतीवरून सुरु झालेला वाद शमता शमत नाही आहे. याउलट हा वाद वाढतच चालला आहे. या वादावर अनेक स्तरावरून विविध प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. त्यात आता या वादावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिकंदर शेख वरून समाजामध्ये द्वेषाचं राजकारण करू नका, तसेच जाती-पातीचं लेबल लावून कुस्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. 

नेमकं ‘त्या’ टांग डावावर काय म्हणाले? 

महाराष्ट्र केसरी कुस्ती (Maharashtra Kesari)स्पर्धेत टांग कोणी कोणाला मारली यावरून चर्चेचा धुरळा उडालाय. यामध्ये कधी अंगाला माती न लावलेले, कधी लंगोट न घातलेले, आखाड्यात शड्डू न ठोकलेले, बिना लंगोटीचे पैलवान आघाडीवर असल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. माझ्या मते जे खेळ करत आहेत, त्यांनीच या वादावर अधिकारवाणी बोलाव. बाकी आमच्या सारख्यांनी तिथे तोंडाची वाफ वाया घालवू नये, अशा शब्दात त्यांनी सुनावलं आहे. 

सिकंदर शेखवरून (Sikandar Shaikh) काही जण समाजामध्ये विनाकारण द्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अशाप्रकारे जातीय स्वरूप देऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. तसेच प्रत्येक मल्लाचा धर्म हा कुस्तीचा असतो, त्याला जाती-पातीचं लेबल लावून कुस्तीला बदनाम करू नका, असे आवाहन देखीव अजित पवारांनी (Ajit Pawar) केले आहे. 

दरम्यान सिंकदर शेख (Sikandar Shaikh) वादावर बोलताना अजित पवारांनी महेंद्र गायकवाडचंही कौतूक केले. महेंद्र गायकवाडलाही कमी लेखू नये, त्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. अंतिम फेरीत त्याने सिकंदर शेखला अस्मान दाखवलं होतं, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

नेमका वाद काय? 

महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari)स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली होती. या लढतीत महेंद्रने मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नसतानात त्याला चार गुण दिले होते. या चार गुणानंतर सिकंदर शेखचा अंतिम लढतीत पराभव झाला होता. या चार गुणावर स्वत: सिंकदर शेखने (Sikander Sheikh)सुद्धा आक्षेप झाला होता. तसेच सोशल मीडियावर आणि कु्स्ती शौकींनांमध्ये सिकंदरवर अन्याय झाल्याचा सुर होता. या वादावर अद्याप पडदा पडू शकलेला नाही आहे. 

दरम्यान हा वाद सुरू असताना सिकंदर शेखने (Sikander Sheikh)पुन्हा मैदानातून विसापूर केसरी गदा पटकावली आहे. त्याच्या या विजयानंतर कुस्तीप्रेमी आनंदी झाले आहेत. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *