Headlines

Sidharth- Kiara च्या लग्नाआधी Karan Johar कडून मोठं सिक्रेट समोर; हे काय बोलून गेला तो?

[ad_1]

Sidharth Malhotra and Kiara Advani Wedding News : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) हे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाच्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. कियारा आणि सिद्धार्थ हे राजस्थान जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये सप्तपदी घेणार असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या लग्नाच्या चर्चांवर लोकप्रिय दिग्दर्शक आणि मित्र करण जोहर (Karan Johar) आणि रॅपर बादशाहनं (Badshah) कोणत्याही गोष्टीचा खुलासा न करता याची पुष्टी केली आहे. त्या दोघांनी केलेल्या या इशाऱ्यांनंतर सिद्धार्थ आणि कियाराच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. 

रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांची सुरुवात आज 4 फेब्रुवारीपासून होणार आहे. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ आणि कियारा सप्तपदी घेणार आहेत. यार पॅलेसमध्ये त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. तर सिद्धार्थ आणि कियाराच्या संगीत कार्यक्रमात सिद्धार्थ स्वत: डान्स परफॉर्म्स देणार आहे. इतकंच नाही तर त्याचं कुटुंब देखील खूप सुंदर डान्स करणार असल्याचे म्हटले जात आहे. जेव्हा बादशाहनं करणला प्रश्न विचारला की, कोणते सेलिब्रिटी आता लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यावर करण काही बोलला नाही मात्र, त्यावर बादशाहनं “आप कितने कियारी बातें करते है” असे म्हटले आहे.

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, संगीत समारंभाच्या रात्री कियारा आणि सिद्धार्थ काला चष्मा, बिजली, रंगासारी, डिस्को दिवाने या गाण्यांवर डान्स करणार आहेत.  सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra Marriage Date) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Updates) अशा अनेक गोष्टी त्यांचे चाहते सर्च करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे दोघे 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.

सिद्धार्थ आणि कियारा या दोघांनी 2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह (Shershaah) या चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर कियारा आणि सिद्धार्थ हे सगळीकडे एकत्र दिसले. 

हेही वाचा : Pathaan Box Office Collection Day 10 : दहाव्या दिवशी शाहरुखच्या ‘पठाण’नं केली दमदार कमाई!

या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ लवकरच, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ (Indian Police Force) या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही सीरिज Amazon Prime वर प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे, कियाराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *