Headlines

Shubhman Gill ला डेट करतेय Sara Ali Khan? ‘या’ ठिकाणी झाले एकत्र स्पॉट

[ad_1]

मुंबई :  झगमगत्या विश्वात (Film Industry) कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. तसं पाहायला गेल तर, आतापर्यंत अनेक क्रिकेटर आणि अभिनेत्री नात्यात अडकले. काहींनी त्यांच्या नात्याला वेगळं वळण दिलं तर, काही मात्र कायमचे विभक्त झाले. आता पुन्हा क्रिकेट विश्वातील आघाडीचा खेळाडू आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीमध्ये प्रेमाचा गुलाब फुलत असल्याची चर्चा रंगत आहे. क्रिकेटर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) रिलेशलशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहे. 

सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल (Viral Photo) होत आहे. फोटोमध्ये शुभमन आणि सारा एकत्र एका हॉटेलमध्ये बसल्याचं दिसून येत आहे.  सुरूवातीला शुभमन सोबत असलेली मेस्ट्री गर्ल सारा तेंडूलकर (Sara Tandulkar) असल्याची चर्चा रंगली होती. 

पण फोटोमध्ये शुभमनसोबत असलेली मेस्ट्री गर्ल सारा तेंडूलकर नसून अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी आणि अभिनेत्री सारा आली खान असल्याच दिसून  येत आहे. फोटो समोर येताच सारा आणि शुभमन यांच्यात प्रेमाचा गुलाब बहरत असल्याची चर्चा रंगत आहे. 

व्हायरल फोटोमागील सत्य 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन सध्या लंडनमध्ये आहे, जिथे तो बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) सारा अली खानसोबत दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दोघे एका रेस्टॉरंटमध्ये दिसले, जिथे ते एकत्र डिनर करत आहेत. हा फोटो दुबईचा सांगितला जात आहे, पण काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्हायरल होत असलेला फोटो लंडनचा असल्याचं सांगितलं जात आहे. 

फोटो कुठलाही असला तरी, सारा आणि शुभमनचा (sara-Shubhman) फोटो चाहत्यांसाठी खूपच आश्चर्यचकित करणारा आहे. आता सारा आणि शुभमन त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करणार या प्रतीक्षेत आता चाहते आहेत. 

 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *