‘माझं शरीर…’; गंभीर आजाराविषयी सांगत श्रुती हासनची भावूक पोस्ट


मुंबई : अभिनेते आणि सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन हिनंही अभिनय जगतामध्ये वेगळी ओळख तयार केली. आपल्या बळावर श्रुतीनं प्रसिद्धी मिळवली. एक अभिनेत्री असण्यासोबत ती व्यक्ती म्हणूनही सातत्यानं सर्वांच्या मनात घर करताना दिसली. बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिचं खुलेपणाणं बोलणं असो किंवा मत एखाद्या विषयावर तिचं मत व्यक्त करणं असो, श्रुती कधीच मागे नव्हती. (Bollywood Actress Shruti Haasan struggles with the PCOS shares heartfelt post)

अगदी आपल्या आजारपणाबद्दलही बोलताना ती मागे राहिली नाही. श्रुतीनं नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ती शरीरात होणारे बदल आणि त्या बदलांना आपण नेमके कोणत्या पद्धतीनं सामोरे जात आहोत याची माहिती दिली. 

PCOS च्या त्रासाला श्रुती गेल्या काही काळापासून सामोरी जात आहे. यावरच प्रकाश टाकणारी एक पोस्ट तिनं शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं भलंमेठं कॅप्शनही लिहिलं आहे. इतकंच नव्हे, तर एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. जिथं ती व्यायाम करताना दिसत आहे. 

‘गेल्या काही काळापासून मी हामोन्ससंदर्भातील तक्रारींना सामोरी जात आहे. PCOS चा सामना करत आहे. महिला हे जाणू शकतात की यामुळं होणारे बदल नेमके कसे असतात. पण, मी मात्र याकडे एक लढाई म्हणून न पाहता शरीरा होणारे नैसर्गिक बदल म्हणून स्वीकारत आहे’, असं तिनं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

योग्य तो आहार, पुरेशी झोर आणि व्यायामाचा आनंद घेत श्रुती या सर्व परिस्थितीला सामोरी जात आहे. माझं शरीर सध्या सुयोग्य परिस्थिती नाही, पण माझं मन मात्र नक्कीच आहे, असं म्हणत तिनं शरीरात आनंदी हार्मोन्सच्या संचाराला वाव दिला आहे. 

श्रुतीनं केलेली ही पोस्ट पाहून बऱ्याच फॉलोअर्स आणि नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. आज अशा कैक महिला आहेत ज्यांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पण, या महिलांनी सदर परिस्थितीकडे त्रास म्हणून न पाहता त्याचा स्वीकार करत जगण्यास सुरुवात केली तर चित्र नक्कीच वेगळं असेल, नाही का? Source link

Leave a Reply