Headlines

न्यूझीलंडच्या गोटात भातीचं वातावरण, श्रेयसच्या जागी ‘या’ खेळाडूची संघात एन्ट्री!

[ad_1]

IND Vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमधील वनडे मालिकेला उद्यापासून सुरूवात होत असून हैदराबादमध्ये पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. त्याचं कारण म्हणज फॉर्ममध्ये असलेला खेळाडू श्रेयस अय्यर वनडे मालिकेमधून बाहेर झाला आहे. श्रेयसच्या जागेवर एका दमदार खेळाडूची निवड करण्यात आली आहे. (IND Vs NZ ODI Rajat Patidar Include Team India Squad for New zealand odi series latest marathi Sport News)

मुंबईकर खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyash Iyer) पाठीच्या दुखण्यामुळे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. श्रेयसच्या जागी संघात रजत पाटीदारला (Rajat Patidar) स्थान मिळालं आहे. रजत पाटीदारचे टी-20 रेकॉर्ड पाहता त्याने 45 सामन्यांमध्ये 44 डावांमध्ये 1466 धावा केल्या आहेत. 

यामधील 12 सामने आयपीएलमधील असून त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली आहेत. त्यासोबतच रजतने 50 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3 हजार 668 धावा केल्या आहेत. यात 11 शतकांचा समावेश आहे. तर 51 लिस्ट ए करिअरमध्ये रजतच्या नावावर 1 हजार 648 धावा आहेत.

रजत पाटीदार हा मूळचा  इंदूरचा असून वनडेमधील तिसरा सामना इंदूरच्या होळकर मैदानावर होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यामध्ये त्याला संधी मिळाली तो घरच्या मैदानावर पदार्पण करू शकतो. 

भारताचा एकदिवसीय संघ: 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार)वॉशिंगट सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराद, उमरान मलिक 

न्यूजीलंडचा भारत दौरा (संपूर्ण शेड्यूल):
पहिली वनडे- 18 जानेवारी, हैदराबाद, दूसरी वनडे- 21 जानेवारी, रायपुर, तीसरी वनडे – 24 जानेवारी, इंदूर
पहिली टी 20- 27 जानेवारी, रांची, दूसरी टी 20- 29 जानेवारी, लखनऊ, तीसरी टी 20- 1 फेब्रुवारी, अहमदाबाद



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *